घरीच नजरकैदेत ठेवण्याची वाझे यांची मागणी

वाझे यांच्या हृदयावर नुकतीच खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अँटालिया स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर आपल्याला घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली आहे. वाझे यांच्या या अर्जावर न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

वाझे यांच्या हृदयावर नुकतीच खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातून सोडण्यात आल्यावर पूर्ण बरे होईपर्यंत आपल्याला कारागृहात पाठवण्याऐवजी घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी करणारा अर्ज वाझे यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाकडे केला आहे.

वाझे यांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह नऊ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.  अँटालिया स्फोटके प्रकरण आणि  ठाणेस्थित व्यावसायिक हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात वाझे यांना अटक झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Badaz police officer sachin waze arrested antalya blasts commercial mansukh hiren murder case akp

ताज्या बातम्या