मुस्लीम महिला बदनामी प्रकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुस्लिम महिलांबाबत अश्लील मजकूर प्रसारीत करण्यात आलेल्या अ‍ॅपशी संबंधित प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी फेटाळले. विशाल कुमार झा, श्लेता सिंह आणि मयांक रावत या तीन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.  

तिघांना जामीन देण्यात आल्यास तिघेही पळून जातील. तसेच पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करतील, असा त्याला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने विरोध केला होता.

  दरम्यान, मुस्लीम महिलांबाबत अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी चौथ्या आरोपीला ओदिशामधून अटक केली. नीरज सिंह असे या  आरोपीचे नाव आहे, अशी माहिती देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bail applications of all the three students were rejected muslim woman defamation case akp
First published on: 21-01-2022 at 01:24 IST