scorecardresearch

Premium

मुंबई: वांद्रे भाभा रुग्णालयाची रक्तपेढी रात्री बंद; रुग्णांचे हाल

अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना तातडीने रक्त मिळावे यासाठी काही सरकारी रुग्णालयांमध्ये रक्तपेढी सुरू करण्यात आल्या आहेत.

blood
मुंबई: वांद्रे भाभा रुग्णालयाची रक्तपेढी रात्री बंद; रुग्णांचे हाल( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई : अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना तातडीने रक्त मिळावे यासाठी काही सरकारी रुग्णालयांमध्ये रक्तपेढी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेली रक्तपेढी रात्री ९ ते सकाळी ८ या वेळेत बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही रक्तपेढी २४ तास सुरू ठेवावी, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

वांद्रे येथील भाभा रुग्णालयामधील रक्तपेढी अनेक वर्षांपासून रात्री बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे रात्री अत्यावस्थेत आलेल्या किंवा गर्भवती महिला, नवजात बालक यांना रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी कूपर किंवा अन्य खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. यामध्ये बराच वेळ जाण्याची शक्यता असते. रुग्णांना तातडीने रक्त मिळावे यासाठी भाभा रुग्णालयाकडून जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयाच्या रक्तपेढीसोबत करार केला आहे. मात्र वांद्रे येथून जुहूला रात्री जाण्यासाठी अनेक वेळा कोणतेही वाहन मिळत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी अडचण होते. भाभा रुग्णालयातील रक्तपेढी रात्री बंद ठेवण्यामागे पुरेसे तंत्रज्ञ नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. रक्तपेढीमध्ये सध्या चार रिक्त पदे आहेत. त्यामुळे अन्य तंत्रज्ञांवर कामाचा भार पडत आहे. परिणामी, ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कूपर रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये २००८ मध्ये तंत्रज्ञांची भरती करण्यात आली होती. मात्र २०२२ मध्ये या रक्तपेढीचे खासगीकरण करण्यात आले. त्यामुळे येथील तंत्रज्ञांना भाभा रुग्णालयात बदली केल्यास तेथील कमतरतेवर तोडगा निघू शकतो. मात्र त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

Updated MRI system in KEM Sion Nair and Cooper within a month
केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये महिनाभरात अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा
Maharashtra public health department Vatsalya scheme pregnant women newborns pune
गर्भवती, बालकांच्या आरोग्यासाठी नवीन ‘वात्सल्य’ योजना! जाणून घ्या नेमका काय फायदा होणार…
Sassoon-hospital-lalit-patil 2
अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलविरुद्ध सात हजार पानांचे आरोपपत्र, पाटीलला ससूनमधून बाहेर जाण्यास ‘याने’ केली मदत
panvel, district hospital, cath lab center, resident for doctors, marathi news,
पनवेल : डॉक्टर निवासाच्या जागी कॅथलॅब सेंटर?

हेही वाचा >>>मुंबई: भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण, दोन महिलांसह पाच जणांना अटक

भाभा रुग्णालयाच्या आसपासच्या रक्तपेढींकडे आम्ही चौकशी केली. परंतु कोणीही करारासाठी तयार नव्हते. त्यामुळे आम्हाला जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयाच्या रक्तपेढीसोबत करार करावा लागला. आमची रक्तपेढी रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असते. त्यावेळेत रुग्णांना रक्त उपलब्ध केले जाते. त्यानंतर रुग्णांना क्रिटी केअरच्या किंवा महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांतून रक्त आणून दिले जाते. यासाठी आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयाची रुग्णवाहिकाही उपलब्ध करतो. – डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक, भाभा रुग्णालय

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bandra bhabha hospital blood bank closed at night plight of patients mumbai print news amy

First published on: 12-09-2023 at 18:15 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×