Premium

अटकेच्या नियमांबाबत ३० ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा – राज्यातील सर्व पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश

आदेशाचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

high-court
उच्च न्यायालय (संग्रहीत छायाचित्र)

अटकेदरम्यान अवलंबण्यात येणारी प्रक्रिया आणि अटकेची कारणे नोंदवण्याबाबत पोलीस महासंचालकांनी नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत राज्यातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने ३० ऑगस्टपर्यंत जागरूक व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, तर संबंधित पोलिसांवर, तसेच त्यांच्या वरिष्ठांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने यावेळी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-ए (घरगुती हिंसा) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणाऱ्या ठाणेस्थित आरोपीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने उपरोक्त आदेश दिले. अटकेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि तपास अधिकाऱ्यांमार्फत सगळ्या पोलिसांना दिली जाईल याची संबंधित पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी खात्री करावी. शासन तसेच पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरही या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state mumbai print news msr

First published on: 14-08-2022 at 12:37 IST
Next Story
मुंबई : ‘एसटी’चा प्रवास आरामदायी करण्याचा प्रयत्न; वातानुकूलित शयनयान बससाठी महामंडळाची चाचपणी