Belapur-Mandwa water taxi service to start from tomorrow mumbai | Loksatta

बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी सेवा उद्यापासून सुरु; प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

वॉटर टॅक्सीच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात झाली असून पहिल्या दिवसासाठी चांगला प्रतिसाद

बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी सेवा उद्यापासून सुरु; प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
बेलापूर ते मुंबई प्रवासा अवघ्या २५ ते ३० मिनिटात पार

बेलापूर – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा शनिवारपासून सुरू होत असून पहिल्याच दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मांडवा – बेलापूर फेरीसाठी ‘हाऊसफुल’ बुकिंग झाली असून सर्वच्या सर्व २०० तिकिटांची विक्री झाली आहे.

हेही वाचा- शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्प : मुंबईतील सर्वात उंच उन्नत मार्ग असल्याचा एमएमआरडीएचा दावा

महाराष्ट्र सागरी मंडळाने जलवाहतुकीला चालना देण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठी २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी मुंबई – मांडवा जलमार्गावर धावत आहे. ही वॉटर टॅक्सी आता शनिवारपासून बेलापूर – मांडवा जलमार्गावर धावणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळा बेलापूर – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली आहे. सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवारी ही वॉटर टॅक्सी धावणार आहे. दिवसाला या वॉटर टॅक्सीच्या केवळ दोन फेऱ्या होणार आहेत. बेलापूर जेट्टी येथून सकाळी ८ वाजता ही वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहचेल. तर संध्याकाळी ६ वाजता मांडव्याहून निघणारी वॉटर टॅक्सी रात्री ७.४५ वाजता बेलापूरला पोहचेल.

हेही वाचा- ‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’:आणखी एका विभागाची निविदा वादात

या वॉटर टॅक्सीच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात झाली असून पहिल्या दिवसासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मांडवा – बेलापूर फेरीसाठी २०० तिकीटांची विक्री झाल्याची माहिती नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली आहे. सर्वच्या सर्व तिकीटांची विक्री झाल्याने समाधान व्यक्त होत असून हा प्रतिसाद असाच वाढेल आणि प्रवाशांना अतिजलद प्रवासाची संधी उपलब्ध होईल असा विश्वास सेवा चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 11:45 IST
Next Story
शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्प : आंबेडकर नगर मोनोरेल स्थानकावरून जाणारा मुंबईतील सर्वात उंच उन्नत मार्ग