मुंबई : बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांच्या सुखद प्रवासासाठी सात मार्गावर वातानुकूलित बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या १ मार्चपासून शहरातील काही बस मार्गाचे सुसूत्रिकरण केले आहे. शहरातील वातानुकूलित बसची संख्या वाढत असून या वातानुकूलित बसमुळे उन्हाळ्यातील प्रवास सुकर होईल, असा दावा करण्यात येत आहे.
बसक्रमांक ए-१ माहिम कोळीवाडा येथून वांद्रे चित्रपटगृहापर्यंत थेट स्वामी विवेकानंद मार्गादरम्यान चालविण्यात येणार आहे. बॅकबे आगार – टाटावीज केंद्र दरम्यानची बसक्रमांक ए-६ कुलाबा आगार / इलेक्ट्रीक हाऊसपर्यंत धावणार आहे. ए-२२ बस जिजामाता उद्यान – मजास आगारदरम्यान, तर ६९ क्रमांकाची बस डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक – प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) बसस्थानकादरम्यान चालविण्यात येणार आहे.
ए-१०१ जागतिक व्यापार केंद्र – सीएसएमटी टर्मिनसदरम्यानची बस महात्मा फुले मंडईपर्यंत धावणार आहे. क्रमांक ४११ वडाळा आगार – संघर्ष नगर (चांदिवली) दरम्यानची बस के. के. कृष्णन मार्ग (९० फूट) – संत रोहीदास मार्गाने धावणार आहे. ए-४१५ बस आगरकर चौक (अंधेरी-पूर्व) – सीप्झ बसस्थानकादरम्यान सुरू असणार आहे.
या मार्गावर वातानुकूलित बस
- ए-१०३ आर.सी.चर्च ते कमला नेहरू उद्यान
- ए-२२४ शास्त्री नगर – बोरीवली बसस्थानक (प)
- ए-२३५ अंधेरी स्थानक (प) – मिल्लतनगर मार्गे
- ए-२४८ अंधेरी स्थानक (प) – रमेश नगर
- ए-२५४ अंधेरी स्थानक (प) – वीरा देसाइ ‘मार्ग (विस्तारीत)
- ए-३६१ माहूल गाव – कुर्ला बसस्थानक (पूर्व)
- ए-४९२ मजास आगार – भूमी एकर्स (ठाणे).
