Best Bus Accident : मुंबईतल्या कुर्ला पश्चिम भागात ९ डिसेंबरच्या रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात ( Best Bus Accident ) सहा जण ठार झाले तर ४० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात चालक संजय मोरेला अटक करण्यात आली. लोकांनी बस चालकाला पकडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली होती. मात्र नंतर पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि त्याला अटक केली.

पोलिसांनी अपघाताबाबत काय सांगितलं?

अपघात (Best Bus Accident) घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल ५० हून अधिक प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ३३२ नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडलाय. तसेच या अपघातानंतर जमावाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचं देखील व्हिडीओद्वारे समोर आलं आहे. अपघात घडल्यानंतर बस चालक संजय मोरे याला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी धाडस दाखवत संजय मोरेला बाहेर काढलं आणि पोलीस स्थानकात घेऊन गेले.

ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
mumbai sessions court Sanjay More Kurla BEST bus accident case
कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : आरोपी संजय मोरेला जामीन नाहीच, सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार
Sanjay Mores bail application in Kurla West BEST accident
कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जावर १० जानेवारी रोजी निर्णय

प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय सांगितलं?

बेस्टच्या चालकांची दादागिरी आम्ही नेहमीच पाहतो, खासगी गाड्या असणारे जेव्हा साईड मागतात तेव्हा साईड हे लोक देत नाहीत. ज्या बसचा अपघात झाला त्याचा वेग खूप जास्त होता असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. तर गजबजलेल्या रस्त्यावर इतक्या वेगात गाडी कशी काय चालवली या लोकांना कुणी जाब विचारणार की नाही? असं दुसरा प्रत्यक्षदर्शी म्हणाला.

हे पण वाचा- Kurla Bus Accident: ‘बस चालकाचं नियंत्रण कसं सुटलं?’, आमदार दिलीप लांडेंनी सांगितलं कुर्ला बस अपघाताचं कारण

५०० मीटर अंतरावरुन बस वाहनं आणि लोकांना उडवत गेली

आणखी एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला की मी समोरच उभा होतो. बस आमच्यासमोरून अत्यंत वेगाने गेली. वाहनं उडवली, ( Best Bus Accident ) लोकांना उडवलं, एकच हलकल्लोळ सुरु झाला. या सगळ्यांना उडवून त्या बस चालकाने महिलेलाही उडवलं. आम्हाला शक्य होतं तेवढी मदत आम्ही लोकांना करत होतो. मात्र पोलीस लवकर आले नाहीत. तरीही लोक एकमेकांना मदत करत होते. साधारण ५०० मीटर पासून बस प्रचंड वेगात आली होती ती वाटेतल्या वाहनांना, लोकांना धडका ( Best Bus Accident ) देत बस आली हे आम्ही पाहिलं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

सर्वात आधी बसने तीन रिक्षांना उडवलं आणि…

चालकाचं संतुलन बिघडलं की काय माहीत नाही पण बसने सुरुवातीला तीन रिक्षांना उडवलं. त्यानंतर ती बस इतर वाहनांना आणि वाटेत येणाऱ्या लोकांना उडवत ( Best Bus Accident ) गेली. आम्ही ते दृश्य पाहून खूप घाबरुन गेलो असंही एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

Story img Loader