मुंबई : कुर्ला येथे झालेल्या अपघातानंतर आता राजकारण तापले आहे. भाडेतत्त्वावरील बसगाड्या आणि चालक यांच्यामुळे असे अपघात वारंवार होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच भाडेतत्त्वारील बसगाड्या घेण्याचा निर्णय हा एकसंघ शिवसेना सत्तेत असताना झाला होता. त्यामुळे भाजपने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करीत ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

कुर्ला येथे झालेल्या अपघातानंतर आता पालिका वर्तुळामध्ये राजकारण तापले आहे. या अपघातानंतर भाजपचे मुंबई महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पत्र पाठवून अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. भाजपच्या माजी नगरसेवकांनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना हे पत्र दिले.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण

हेही वाचा – कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

बेस्ट बसचा असा अपघात होणे अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना बेस्ट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणारी आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. बेस्ट ताफ्यातील एकूण बसगाड्यांपैकी दोन हजार बसगाड्या भाडेकरार तत्त्वावरील आहेत. या भाडेकरारानुसार कंत्राटदार बसगाड्यांचा पुरवठा करीत असून या बसगाड्यांवर चालकही कंत्राटदार संस्थेचा असतो. कंत्राटदाराने नेमलेले बसचालक नवीन असतात. त्यामुळे त्यांना मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यांवर बसगाडी चालवणे जमत नाही. त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत आहे, असा आरोप शिंदे यांनी आपल्या पत्रात केला आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या अपघातात जीव गमवाला आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची सखोल चौकशी करून या घटनांसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. केवळ एका वाहनचालकावर कारवाई करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर भाजप ते सहन करणार नाही असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

हेही वाचा – ३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी

u

बेस्ट अपघातात बेस्टचालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा; तसेच जखमी नागरिकांना ५० हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत तातडीने मदत द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

आदित्य ठाकरे लक्ष्य ….

बेस्टमध्ये भाडेकरार तत्त्वावर बसगाड्या घेण्याचे कंत्राट २०१८ ते २०२१ या काळात देण्यात आले. त्यावेळी शिवसेना सत्तेवर होती. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार हे कंत्राट देण्यात आले होते, असा आरोप भाजपने या पत्रात केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला त्यावेळी भाजपाने त्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढलेले अपघात आणि झालेली जीवितहानी यामुळे या मुद्द्यांचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजपने केली आहे.

Story img Loader