best bus advertisement, best bus, loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathiआíथक प्रगतीच्या नावाने बोंब असलेल्या बेस्टचे उत्पन्न वाढवण्यात प्रशासनातील अधिकारी अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. जाहिरातींच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात उत्पन्न अपेक्षित असतानाच निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी न करता एकाच जाहिरात संस्थेवर कृपादृष्टी करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टचे किमान सहा ते सात कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

‘गोरेगाव स्पोर्ट्स क्लब’ येथील बेस्टच्या भूखंडावर चाळीस बाय चाळीस मीटर फलकावर जाहिरात करण्यासाठी ‘सिम्बॉसिस अँडव्हर्टायिझग’ या संस्थेची २००६ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्याच संस्थेला पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले. या वेळी प्रशासनाने निविदा मागवल्या असतानाही एकही निविदा दाखल झाली नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. त्यानुसार २००६ ला पुढील १० वर्षांसाठी कंत्राट वाढवून देण्यात आले. मात्र या प्रकियेत बेस्टचे नुकसान होत असून यात बेस्ट समितीला अंधारात ठेवल्याचा आरोप केला जात आहे. तर गोरेगाव येथील भूखंडावर जाहिराती करण्यासाठी अन्य काही संस्था अधिक दर देण्यास तयार आहेत, मात्र त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने बेस्टचे मोठय़ा प्रमाणात आíथक नुकसान होत असल्याचा आरोप बेस्ट समितीतील काँग्रेसचे सदस्य रवी राजा यांनी केला आहे. तसेच निविदा प्रक्रिया न राबवता एकाच संस्थेला २०२४ पर्यंत कंत्राट देणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले.