scorecardresearch

मुंबई विमानतळावरून बेस्टची २४ तास सेवा

१ मेच्या निमित्ताने ही सेवा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई विमानतळ)ते शहरातील विविध भागांत जाण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ऑक्टोबर २०२१ पासून वातानुकूलित बससेवा सुरू केली. १ मेच्या निमित्ताने ही सेवा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.   मुंबई विमानतळापासून ते बॅकबे तसेच वाशी, आणि ठाणेसाठी टप्प्याटप्यात बससेवा सुरू केली. आता ही सेवा २४ तास उपलब्ध असेल. यात बॅकबेपर्यंतचे प्रवास भाडे १७५ रुपये, ठाणे तसेच वाशीपर्यंतचे भाडे १५० रुपये असेल, अशी माहिती त्यांनी दिली. विमानतळ एक येथून रात्री ११ वाजताही दर दोन तासांनी पहाटे सातपर्यंत, तर बॅकबे येथून मध्यरात्री बारा वाजल्यापासून दर दोन तासांनी सकाळी आठ वाजेपर्यंत बस उपलब्ध असेल. वाशीसाठीही रात्री सव्वा अकरा वाजल्यापासून ते पहाटे सव्वा सातपर्यंत आणि वाशी येथून विमानतळासाठी मध्यरात्री सव्वा बारापासून ते पहाटे सव्वा आठ वाजेपर्यंत बससेवा असणार आहे. ठाणेसाठी रात्री साडेअकरा वाजल्यापासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत आणि ठाणे येथून विमानतळासाठी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत दर दोन तासांनी बससेवा असतील.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best buses 24 hours service from mumbai airport zws

ताज्या बातम्या