मुंबई : बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहरात वीजपुरवठा केला जातो. मात्र शहरात अनेक ठिकाणी वीजेची चोरी केली जाते. अशा वीज चोरांविरोधात बेस्टच्या दक्षता पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. मात्र दंडवसुली करण्यात बेस्ट अपयशी ठरत आहे. बेस्टने गेल्या दोन वर्षांत वीज चोरीची ३,६६९ प्रकरणे नोंदवून ५४.२५ कोटी रुपये दंड आकारला. दरम्यान आकारलेल्या दंडाच्या जवळपास ७८ टक्के म्हणजेच ४२.२३ कोटी रुपये वसूली अद्याप झालेली नाही. केवळ १२.०२ कोटी रुपये वसूल झाले आहेत. यामुळे बेस्टचा हक्काचा महसूल बुडत आहे. महत्त्वाचे म्हणजे भायखळा परिसरात सर्वाधिक १४ कोटी रुपये दंड वसूल झालेला नाही.
शहरात बेस्टचे १० लाख ६० हजार ग्राहक आहेत. विद्युतपुरवठा विभाग परिवहन विभागाच्या तुलनेत नफ्यात होता. सध्या हा विभाग विविध कारणामुळे तोट्यात जाऊ लागला आहे. विद्युतपुरवठा विभागाला वीज चोरीचा मोठा फटका बसत आहे. छोटे-मोठे उद्योगधंदे, तसेच घरगुती वीज वापरकर्त्यांकडून वीज चोरी केली जाते. अनधिकृत झोपडपट्यांमध्येही अवैध जोडणी करून विजेचा वापर करण्यात येत आहे. मुंबईतील विविध भागात अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथांवरच बस्तान मांडले असून यापैकी बहुसंख्य फेरीवाले अनधिकृतपणे विजेचा वापर करतात. मीटरशिवाय थेट विद्युतपुरवठा घेऊन वीज चोरी करण्यात येते. या वीज चोरांविरूद्ध बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात येते. मध्य मुंबईतील एफ-उत्तर विभागामध्ये (माटुंगा, शीव, वडाळा) सर्वाधिक १,२२५ वीज चोरीची प्रकरणे आढळली असून ६.५ कोटी रुपये दंडाची थकबाकी आहे. जी-उत्तर विभागात (धारावी, माहीम, दादर) बेस्टने शोधलेल्या वीज चोरीच्या १,०१३ प्रकरणांमध्ये तब्बल १२.३ कोटी रुपये दंड थकीत आहे. भायखळ्यामध्ये (ई विभाग) ५११ वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक १४.९ कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. कुलाबा, फोर्ट आणि चर्चगेटसारख्या श्रीमंत परिसरांमध्येही १.६ कोटी रुपये दंड थकीत आहे .
सर्वाधिक थकीत रक्कम असलेले वॉर्ड
वॉर्ड परिसर
- गुन्हे – दंड वसुली – थकीत दंड एफ-उत्तर – माटुंगा, सायन, वडाळा – १,२२५ – ३ कोटी – ६.५ कोटी जी-उत्तर – धारावी, माहिम, दादर – १,०१३ – ३.६ कोटी – १२.३ कोटी ई
- भायखळा
- ५११ – २.१ कोटी – १४ कोटी बी
- डोंगरी, भेंडी बाजार
- ३१९ – ७५लाख – २.१ कोटी ए
- कुलाबा, फोर्ट, चर्चगेट – २२२ – ४३.३ लाख – १.६ कोटी डी – गिरगाव, ग्रटरोड, ताडदेव – १४७ – ५९.५ लाख – २.३ कोटी दंड वसुली कमी होण्याची मुख्य कारणे हप्त्यांची सवलत घेऊन डिफॉल्ट करणे: अनेक वीज चोर सुरुवातीला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दंडाचा काही हिस्सा हप्त्यांच्या स्वरूपात भरतात, परंतु त्यानंतर पुढील हप्ते भरत नाहीत. कनेक्शन सोडून देणे: जेव्हा बेस्टचे दक्षता पथक चोरीचे मीटर जप्त करते, तेव्हा ग्राहक दंड भरण्याऐवजी ते कनेक्शनच सोडून देतात, ज्यामुळे हे प्रकरण कायदेशीर वादात अडकते. कायदेशीर त्रुटींचा गैरवापर: आरोपी कायद्यातील पळवाटांचा शोध घेऊन वसुली टाळण्याचा प्रयत्न करतात. वीजेची चोरी रोखण्यासह दंड वसुली करण्यासाठी बेस्टने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. दंड वसुली करण्यासाठी एक समिती स्थापन करून त्यामार्फत एखाद्या कंपनीला काम द्यावे. आर्थिक तोट्यातील बेस्टला महसूल मिळणे अत्यंत आवश्यक आहे.- रमाकांत गुप्ता,बेस्ट समिती सदस्य (भाजपा)
