scorecardresearch

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘बेस्ट’ योजना  चलो ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना ७५ टक्के सवलत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून चलो ॲप डाऊनलोड केल्यानंतर बसपास पर्याय निवडावा.

best bus
(संग्रहीत छायाचित्र)

बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमाने सवलतीची योजना सुरू केली आहे. चलो ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना ७९९ रुपयांची सुपर सेवर योजना ७५ टक्के सवलतीत म्हणजेच १९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. ही योजना ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार असल्याची माहिती उपक्रमाने दिली. यामध्ये २० रुपयांच्या ५० फेऱ्यांचाही समावेश असणार आहे.

हेही वाचा >>> गणेशोत्सवानिमित्त आजपासून बेस्टची नऊ मार्गांवर विशेष सेवा

वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित बसमध्ये ही सवलत मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून चलो ॲप डाऊनलोड केल्यानंतर बसपास पर्याय निवडावा. गणेशोत्सव योजना निवडून प्रवाशांनी त्याचा तपशील भरुन आपला फोटो अपलोड करावा. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तसेच नेट बॅंकिंग किंवा यूपीआयद्वारे १९९ रुपये अदा करून ही योजना घ्यावी, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. योजना कार्यान्वित करण्यासाठी ‘यूज नाऊ’वर क्लिक करावे. बसमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘स्टार्ट ए ट्रीप’वर बटन दाबून प्रवाशाने मोबाइल बस वाहकाच्या तिकीट यंत्राजवळ वैधतेसाठी धरावा. वैधता पूर्ण झाल्यावर प्रवासाकरीता डिजीटल पावती उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-08-2022 at 19:28 IST
ताज्या बातम्या