गणेशोत्सव कालावधीत नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. ही सेवा ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असेल, अशी माहिती उपक्रमाने दिली. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार त्यात आणखी वाढ केली जाणार आहे.

हेही वाचा – राज्यात एसटीचे सहा लाख सवलतधारक स्मार्ट कार्डपासून वंचित

दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांना विशेषता फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा येथे रात्री गणपतीच्या दर्शनासाठी येणारे प्रवासी, भाविकांच्या सोयीसाठी खास डबलडेकर हेरिटेज टूर बससेवा ३१ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे. या बस रात्री १० ते सकाळी ६ पर्यत सेवेत असतील. या सेवेची सुरुवात संग्रहालयापासून येथून गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईण्ट, मरिन ड्राईव्ह, चर्चगेट, महर्षि कर्वे रोड,गिरगाव चर्च, प्रार्थना समाज,ताडदेव, मुबई सेट्रल.भायखळा,जिजामाता उद्यान,लालबाग आणि परत भायखळा, मुंबई सेंट्रल, ताडदेव, चर्नीरोड, मरिन लाईन्स, मेट्रो सिनेमा, सीएसएमटी येथून संग्रहालयापर्यत हॉप ऑन हॉप ऑफ़ पद्धतीने धावणार आहे. या बसच्या वरच्या मजल्यासाठी ७५, तर खाली बसण्यासाठी १५० रुपये तिकिट आकारण्यात येणार आहे.

बसमार्ग क्र १ मर्या.- इलेक्ट्रीक हाऊस, कुलाबा आगार ते वांद्रे रेक्लेमेशन बसस्थानक

बस मार्ग क्र.४ मर्या- ओशिवरा आगार ते सर जे.जे रुग्णालय
बस मार्ग क्र. ७ मर्या-विक्रोळी आगार ते सर जे.जे रुग्णालय

बस मार्ग क्र.८ मर्या- शिवाजी नगर ते सर जे.जे रुग्णालय
बस मार्ग क्र ६६ मर्या.-राणी लक्ष्मीबाई चौक ते कुलाबा आगार

बस मार्ग क्र.२०२ मर्या- माहीम बस स्थानक ते बोरीवली स्थानक (पश्चिम)
सी-३०२ राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)

सी-३०५ बॅकबे आगार ते धारावी आगार
सी-४४० माहीम बसस्थानक ते बोरीवली स्थानक (पूर्व)