scorecardresearch

मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची विशेष बस सेवा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी  विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

best to run additional special buses
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देतात. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने १८ फेब्रुवारी रोजी बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी  विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> कुर्ल्यातील इमारतीत भीषण आग ; वृद्ध महिलेचा मृत्यू

महाशिवरात्रीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्रमांक १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बस फेऱ्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७. ३० दरम्यान चालविण्यात येणार आहेत. तसेच बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्रमांक ५७ वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान – शिवडी, बसमार्ग क्रमांक ६७ वाळकेश्वर ते ॲन्टॉप हिल आणि बसमार्ग क्रमांक १०३ वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक या मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान ६ अतिरिक्त बस फेऱ्या चालविण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमातर्फे देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 13:35 IST