मुंबई : ठिकठिकाणच्या उंच गतिरोधकामुळे नवीन विद्युत वातानुकूलित दुमजली बसचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे उंच गतिरोधकांमुळे चालकांना होणारा त्रास आणि बेस्ट बसचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बेस्ट उपक्रम सर्वेक्षण करणार आहे. बेस्ट मार्गाची पाहणी करून लवकरच अहवाल तयार केला जाणार आहे. मुंबईतील अनधिकृत आणि चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आलेल्या गतिरोधकांची संख्या अधिक आहे. या गतिरोधकामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड होते. तसेच अशा गतिरोधकामुळे वाहतूक कोंडी होते. यासह अनेक वेळा अपघात होतात. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बसचे उंच गतिरोधकामुळे नुकसान होते. बसचा खालील भाग आणि रस्त्यामधील उंचीचे अंतर कमी असल्याने उंच गतिरोधकावरून या बस जाताना खालून घासल्या जातात. हेही वाचा.गोविंदा अद्याप विम्यापासून वंचित, विमा संरक्षणावरून दोन संस्थांमध्ये वादाची हंडी चालकांनी गतिरोधकावरून वेगात बसगाडी नेल्यामुळे प्रवाशांना दुखापत झाल्याची घडना घडली आहे. त्यामुळे गतिरोधकावरून बस चालवणे चालकांसाठी अवघड झाले आहे. परिणामी, बेस्ट प्रशासन याबाबत सर्वेक्षण करणार आहे. विद्युत वातानुकूलित दुमजली बस धावत असलेल्या मार्गावरील उंच गतिरोधकाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर संबंधित विभागाला कळवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकऱ्याने सांगितले. हेही वाचा.केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या गळ्याखालील ३० सेमी गाठ काढली, चार वर्षांच्या त्रासातून रुग्णाची सुटका बेस्ट उपक्रमातील जुन्या दुमजली बसची बांधणी उत्तम प्रकारची होती. प्रवाशांना उभे राहण्यास जागा होती. मात्र नवीन विद्युत वातानुकूलित दुमजली बसची बांधणी प्रवाशांसाठी गैरसोयीची आहे. जुन्या बसची उंची १४.५ मीटर होती, तर नवीन बसची उंची १६ मीटर आहे. जुन्या बसपेक्षा नवीन बसची उंची अधिक असल्याने नवीन बसचे अनेक मार्ग बदलले आहेत. तसेच या बसचा ग्राउंड क्लीयरन्स जास्त असल्याने उंच गतिरोधकांमुळे कोट्यवधी रुपयांच्या बसचे नुकसान होत आहे. - रुपेश शेलटकर, ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’