scorecardresearch

‘बेस्ट’ची आता अखंड सेवा

रुग्णालय, हॉटेलसह अन्य विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुंबईत कोणतेही वाहतुकीचे साधन उपलब्ध होत नाही.

रुग्णालय, हॉटेल कर्मचाऱ्यांसाठी मध्यरात्रीनंतरही बस

मुंबई : रुग्णालय, हॉटेलसह अन्य विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुंबईत कोणतेही वाहतुकीचे साधन उपलब्ध होत नाही. या मंडळींची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने मुंबईतील काही मार्गावर मध्यरात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत बेस्ट बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा ७ मार्चपासून सुरू होईल.

उपनगरीय रेल्वेची सेवा मध्यरात्री १२ नंतर कमी होते. सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.३१ वाजता कुल्र्यासाठी, चर्चगेट येथून मध्यरात्री एक वाजता बोरिवलीसाठी लोकल सुटते. या दोन्ही स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या लोकलही याच दरम्यान बंद होतात. त्यामुळे रुग्णालय, हॉटेल, विमानतळ अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा घरी पोहोचण्यास वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने मध्यरात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत दर एक तासानंतर काही मार्गावर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बस रात्रीपासून सुरू होणार असल्याने ‘हात दाखवा, बस थांबवा’ ही योजनाही राबवण्यात येणार आहे.

पुढील मार्गावर बस सेवा 

  • बसमार्ग क्रमांक १ – इलेक्ट्रिक हाऊस ते माहीम बस स्थानक
  • बसमार्ग क्रमांक ६६ मर्या. – इलेक्ट्रिक हाऊस ते राणी लक्ष्मीबाई चौक
  • बसमार्ग क्रमांक २०२ – माहीम बस स्थानक ते पोयसर आगार
  • बसमार्ग क्रमांक ३०२ – राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड) बसमार्ग
  • क्रमांक ३०५ – बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक
  • बसमार्ग क्रमांक ४४० – माहीम बस स्थानक ते बोरिवली स्थानक पूर्व द्वारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Best uninterrupted service midnight hospital hotel staff ysh