मुंबई: भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी सोमवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी जाळल्या. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

खिंडीपाडा येथील गडवाडी चाळ परिसरात वास्तव्यास असलेले तक्रारदार सलिम खान (४१) यांनी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री त्यांची दुचाकी चाळीच्या बाहेरील रस्त्यावर उभी केली होती. त्याच ठिकाणी अन्य काही रहिवाशांनी आपल्या दुचाकी उभ्या केल्या होत्या. यापैकी पाच दुचाकींनी सोमवारी पहाटे अचानक आग लागली. यासंदर्भात माहिती मिळताच सलिम खान यांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलीम खान यांच्या दोन दुचाकींचा त्यात समावेश होता. इतर तीन दुचाकी परिसरातील रहिवाशांच्या आहेत. याबाबत त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.