मुंबई : भांडुप येथील तुळशीपाडा परिसरात बुधवारी सकाळी ९.३४ च्या सुमारास २१ मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून एक महिला पडली आणि झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली. झाडामुळे तिचा जीव वाचला. दरम्यान, जखमी झालेल्या त्या महिलेवर अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू असून सद्यस्थितीत तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
एसआरएच्या सनशाईन इमारतीच्या सदनिका क्रमांक १००२ मध्ये महिला वास्तव्यास आहे. सकाळी अचानक ती खिडकीतून खाली पडली. मात्र इमारतीच्या आवारातील एका झाडावर ती पडल्याने मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेला खाली उतरवले.
Bhandup News Woman Falls from 10th floor pic.twitter.com/nOoB8yXgwS
— chaitanya sudame (@ChaitanyaSudame) August 26, 2026
झाडावर जोराने आदळल्याने महिला जखमी झाली होती. त्यामुळे उपचारासाठी तिला नजीकच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, जखमी महिलेचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
