‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात असताना काँग्रेसचे नेते राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या याच विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राहुल गांधी यांची यात्रा थांबवण्यात यावी तसेच त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. उद्धव ठाकरे गटानेदेखील राहुल यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असे स्पष्ट केलेले आहे. विशेष म्हणजे अशा वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी संपुष्टात येऊ शकते, असा इशाराही ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी दिला आहे. असे असतानाच आता राहुल गांधी यांनी राऊतांना थेट फोन केला आहे. या विषयी खुद्द संजय राऊतांनी माहिती दिली आहे. ते आज (२१ नोव्हेंबर) सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>> कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तुमच्या पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जाणार? शिंदे गटाच्या बड्या नेत्याने सांगितलं, म्हणाले “आम्ही सर्व…”

“राहुल गांधी यांनी मला काल रात्री फोन केला होता. याआधीही त्यांनी माझी चौकशी केलेली आहे. मात्र त्यांनी काल प्रत्यक्ष फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. आम्हाला तुमची काळजी होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती, असे राहुल गांधी मला म्हणाले. त्यांनी माझी प्रेमाने चौकशी केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा >>>>प्रकाश आंबेडकर मंचावर असताना उद्धव ठाकरेंचे विधान, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले “…हे आमचे हिंदुत्व नाही, अजिबात नाही!”

“राजकारणात सध्या कडवटपणा आलेला आहे. राहुल गांधी यांनी केलेला फोन म्हणजे प्रेमाची झुळूक आहे. व्यग्र कार्यक्रमात असताना वेळ काढून राहुल गांधी यांनी मला फोन केला. राजकारणात आज कोणी कोणाचा मित्र राहिलेला नाही. मी तुरुंगात असताना माझ्या घरी किती लोक आले, याची मला कल्पना आहे. किती लोकांनी माझी चौकशी केली, याचीही मला कल्पना आहे. ठाकरे परिवार, आमचा पक्ष, शरद पवार, पवार यांचे कुटुंबीय, काँग्रेसचे इतर सहकारी अशा लोकांनी माझी चौकशी केली. भारतीय जनता पार्टी, मनसे हे आमचे एकेकाळचे सहकारी होते. मात्र त्यांना माझी चिंता वाटली का?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा >>>> कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील विधानानंतर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले ” बुद्धी भ्रष्ट…”

राहुल गांधी यांच्यासारखे नेतृत्व देशभरात फिरत आहे. आमचे थोडेफार राजकीय मतभेद असतानाही त्यांनी माझी वारंवार चौकशी केली, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jodo yatra rahul gandhi calls sanjay raut ask about his health prd
First published on: 21-11-2022 at 10:18 IST