scorecardresearch

‘लता मंगेशकर संगीत महाविद्यालया’चे उद्घाटन

‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’साठी तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘लता मंगेशकर संगीत महाविद्यालया’चे उद्घाटन
भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर

मुंबई : ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’साठी तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी या महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयासाठी काहीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाविद्यालयासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाला मुंबई विद्यापीठाच्या ‘कलिना कॅम्पस’मध्ये सात हजार चौरस फुटांची जागा सुपूर्द करण्यात आली आहे. येथील मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे  महाविद्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.उद्घाटन सोहळय़ात पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि प्रसिध्द बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना अनुक्रमे  २०२० आणि २०२१ साठी ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’  देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालय संगीताची पंढरी बनेल, असा विश्वास आदिनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केला.

‘सम्राज्ञी’ माहितीपट..

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘सम्राज्ञी’ माहितीपटाच्या निर्मितीची घोषणा अनुष्का मोशन पिक्चर्स, एन्टरटेन्मेट व लतिका क्रिएशन्स यांनी केली. ‘एल. एम. म्युझिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरेश पै आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया हे त्याची निर्मिती करणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या