scorecardresearch

“रामदास कदम मुख्यमंत्री झाले, तर ही…”, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

“तुम्ही पक्षाचं चिन्ह आणि नाव घेतलं ते कसं टिकेल याची…”

bhaskar jadhav
भास्कर जाधव रामदास कदम ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा ही ‘ढ’ विद्यार्थ्यांची होती. उद्धव ठाकरेंची सभा ५ मार्चला त्याच मैदानावर झाली. त्यामुळे आमच्या सभेचा विक्रम आणि उच्चांक त्यांच्या डोळ्यांसमोर होते. त्याासाठी अर्ध्या महाराष्ट्रातून लोक आणली गेली. तरीदेखील आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत. म्हणून त्यांना ‘ढ’ विद्यार्थी म्हणतो, अशी खिल्ली शिवसेना ( ठाकरे गट ) भास्कर जाधव यांनी उडवली आहे. ते विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले, “गेले आठ महिने रामदास कदमांकडून एकही नवीन मुद्दा उपस्थित केला जात नाही. मला आणि माझ्या मुलाला कसं संपवलं, हेच सांगतात. काल म्हटलं, मी विरोधी पक्षनेता होतो, म्हणजे पुढचा मुख्यमंत्री झालो असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. रामदास कदम मुख्यमंत्री झाले तर ही सर्वात मोठी चेष्ठा असेल. म्हणून रामदास कदमांना आता कोकणातील जोकर ही नवीन उपमा देण्याची गरज आहे.”

हेही वाचा : “सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”, जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर बावनकुळे संतापले; म्हणाले…

मातोश्रीची दार उघडी ठेवल्यावर बाकीचे सुद्धा निघून जात फक्त पितापुत्र राहतील, असं एकनाथ शिंदेंनी सभेत म्हटलं. याबद्दल विचारलं असता भास्कर जाधवांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंचा पक्ष शिल्लक राहील की नाही, त्याची काळजी तुम्ही कशाला करता. तुम्ही पक्षाचं चिन्ह आणि नाव घेतलं ते कसं टिकेल याची काळजी केली पाहिजे. पक्ष चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरेंना मिळणार, हे सर्वांना माहिती आहे.”

“भाजपाने लिहलेली स्क्रीप्ट मुख्यमंत्री बोलत होते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा मोठेपणा, ३७० कलम, राममंदिर यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. राममंदिर काय भाजपाने बांधलं का?”, असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “मला सध्या १०वी नापास झाल्यासारखं वाटतंय”, राज ठाकरेंची निवडणुकीवर मिश्किल टिप्पणी!

“उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेली लोक त्यांना पाठिंबा, आशीर्वाद देण्यासाठी आले होतं. ते शेवटपर्यंत राहिले. यांच्या सभेला आलेली लोक पाठीमागं लागत आणि आमिष दाखवून आणली होती. ती सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या सभेला पाठ फिरवून निघून गेली,” असेही भास्कर जाधवांनी म्हटलं.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 14:43 IST

संबंधित बातम्या