मुंबई : घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर जाहिरात फलक कोसळला. या दुर्घटनेतील आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला उदयपूर येथून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीला एका रिसॉर्टवरून अटक करण्यात आली आहे.

जाहिरात फलक कोसळल्यानंतर लगेचच भिंडे याने अटकेच्या भीतीने पळ काढला. मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या मुलुंड येथील घरी पोहोचले. पण तो पसार झाला होता. पोलिसांना त्याचे शेवटचे ठिकाण लोणावळा असल्याचे समजले त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. मात्र तो घटनास्थळी सापडला नाही. त्याचा मोबाईल बंद असून त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. लोणावळा येथून तो राजस्थानमध्ये पळाला. अखेर भिंडेला उदयपूर येथील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली.

Mumbai police marathi news, Mumbai police lok sabha marathi news
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑपरेशन ऑलआऊट; १०९५ गुन्हेगारांची तपासणी, ५८३६ वाहनांची तपासणी
mumbai Municipal corporation Notice to western railway Demands Removal of Illegal Giant Billboards in Dadar
मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील दोषी जाहिरात कंपनीचे आणखी आठ फलक दादरमध्ये, पालिका प्रशासनाची पश्चिम रेल्वेला नोटीस
fire broke out while cutting the giant board at the petrol pump
मुंबई : महाकाय फलक कापताना दुर्घटनाग्रस्त पेट्रोल पंपावर आग
Mumbai rdx india marathi news, Pakistan rdx Mumbai marathi news
पाकिस्तानातून मुंबईत आरडीएक्स येणार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा दूरध्वनी; रेल्वे स्थानक आणि परिसरात गस्त वाढवली
wadala parking tower collapse
वडाळा पार्किंग टाॅवर दुर्घटना : झोपु प्राधिकरणाकडून विकासकाला कारणे दाखवा नोटीस
Mumbai, Ghatkopar, 14 dead, Unauthorized Billboard Collapses in Ghatkopar, Police Investigate, dust strom, Ghatkopar news, mumbai news,
मुंबई : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या १४
Pench Tiger Reserve, Rare Sighting, Leopard Cat, Rare Sighting Leopard Cat Spotted , Maharashtra, wild life, forest department, jungle, Leopard Cat in Pench Tiger Reserve, marthi news, Pench Tiger Reserve news,
मध्य भारतामधील बिबट्या मांजराचे पहिले दर्शन महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी…
535 buildings declared dangerous in navi Mumbai
नवी मुंबईत ५३५ आणि पनवेलमध्ये ७९ धोकादायक बांधकामे

हेही वाचा…मुंबई : उमेदवारी मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा, शिंदे गटाचा विभागप्रमुख व सचिवाविरोधात गुन्हा

इगो मीडिया कंपनीचा संचालक भिंडे याच्यावर यापूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्ह दाखल आहे. २००९ मध्ये भिंडेने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी महापालिकेच्या परवानगी शिवाय फलक लावल्याप्रकरणी त्याच्यावर २१ वेळा कारवाई करण्यात आली होती. याशिवाय दोन वेळा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्या अंतर्गत त्याच्याविरोधात खटले दाखल होते. धनादेश न वठल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्या खटला चालतो. यापूर्वी २४ जानेवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात भिंडे यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा…के.सी. महाविद्यालयाचे सभागृह भाजपच्या कार्यक्रमासाठी दिल्याने वाद, युवा सेनेकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रार

मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना याबाबत विचारले असता त्यांनी भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले असून मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.याशिवाय, मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भिंडे १० वी पास असून त्याची दोन कोटी रुपयाची मालमत्ता असल्याचे त्याने जाहीर केले होते. त्यावेळी विधानसहा निवडणूकीत भिंडेला १४४१ मते पडली होती. पंतनगर पोलिसांनी सोमवारी रात्री जाहिरात फलक पडून अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भिंडेविरोधात भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (गंभीर दुखापत), ३३७ (निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.