scorecardresearch

भिवंडीत स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा-पटोले

भिवंडीला पुन्हा काँग्रेस गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : भिवंडीच्या जनतेने कायमच काँग्रेस विचारांना साथ दिली असून भिवंडी काँग्रेसचा गड राहिला आहे, पण काही लोकांनी पक्षाशी गद्दारी केल्यामुळे आपली पीछेहाट झाली होती. पण आता काँग्रेस पक्षात लोक परतू लागले असून भिवंडीला पुन्हा काँग्रेस गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भिवंडी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या व समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.    या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व भिवंडीचे प्रभारी मुनाफ हकीम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhiwandi congress flag congress state president nana patole akp