मुंबई: येस बँक-डीएचएफएल प्रकरणात अटक करण्यात आलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी गैरव्यवहारातील २९२ कोटी रुपये इतरत्र वळल्याचा आरोप आहे.  याप्रकरणात त्यांना ६८ कोटी रुपये सल्ला शुल्क म्हणून मिळाले असून याबाबत सीबीआय अधिक तपास करत आहे.  याप्रकरणी मार्च २०२० मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. गैरव्यवहारातील रक्कम बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीने इतरत्र वळण्यात आल्याचा सीबीआयला संशय आहे. त्या संशयावरून ३० एप्रिलला सीबीआयने बांधकाम व्यवसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यात अविनाश भोसले यांच्या  पुण्यातील एबीआयएल कंपनीशी संबंधीत ठिकाणांचाही समावेश होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, अविनाश भोसले यांना दोन दिवस नजरकैदेत ठेवण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले.  याप्रकरणी सीबीआयने भोसले यांची १० दिवसाची कोठडीची मागितली होती. मात्र भोसलेंवर करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला व त्यांची कोठडी सीबीआयला देण्यास विरोध केला. त्यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवून त्यांना जेवण, वैद्यकीय सुविधा देण्याची तयारी दर्शवली. यावेळी न्यायालयाने २८ आणि २९ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत त्यांचे वकील विजय अग्रवाल व धवल मेहता यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय ३० मे रोजी अविनाश भोसले यांना सकाळी ११ वाजता न्यायालयात घेऊन येण्यास सांगण्यात आले.  बाजू मांडण्यासाठी सीबीआयला सोमवापर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत भोसलेंना बीकेसीच्या सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल कंपनीला तीन हजार ९८३ कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यात राणा यांना ६०० कोटी रुपयांची रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. कपूर कुटुंबीयांचे नियंत्रण असलेल्या डूइट अर्बन वेन्चर इंडिया प्रा.लि. या कंपनीला कर्जाच्या रुपाने हे ६०० कोटी रुपये देण्यात आले होते. त्यानंतर वांद्रे रिक्लेमेशन प्रकल्पासाठी येस बँकेने आणखी ७५० कोटी रुपयांचे कर्ज डीएचएफएल कंपनीच्या समूहातील आरकेडब्ल्यू डेव्हलपर प्रा.लि. ला दिले. ती रक्कम कपील वाधवान व धीरज वाधवान यांनी इतरत्र वळते केले. याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयने या रकमेबाबत अधिक तपास केला असता गैरव्यवहारातील ६८ कोटी रुपये सल्ला शुल्क म्हणून मिळाले, अशी माहिती सीबीआयने न्यायालयाला दिली. तीन प्रकल्पांसाठी २०१८ मध्ये भोसले यांना हे ६८ कोटी रुपये मिळाले होते. त्यातील ऍव्हेन्यू ५४ व वन महालक्ष्मी हे दोन  प्रकल्प बांधकाम व्यवसायिक संजय छाब्रिया यांनी विकसित केले होते. तसेच भोसले यांना वरळीतील एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाली. प्रकल्पाचा संभाव्य खर्च, वास्तुविशारद व अभियांत्रिकी आराखडा, प्रकल्प बांधकाम व करार, वित्तीय मूल्यांकन व संरचना आदी गोष्टींबाबत भोसले यांच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. पण भोसले यांच्या कंपन्यांकडून अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नसल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले.  याशिवाय संजय छाब्रिया यांची कंपनी रेडियस ग्रुपला डीएचएफएलकडून घेतलेल्या दोन हजार कोटी रूपयांच्या कर्जातील २९२ कोटी ५० लाख रुपये भोसले यांच्यामार्फत ती रक्कम इतरत्र वळवण्यात आली. दोन कंपन्यांमार्फत ती रक्कम वळवण्यात आली असून त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सीबीआयने भोसले यांच्या कोठडीची मागणी केली. याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप यांच्याकडेही गेल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते. छाब्रिया यांना सीबीआयने याप्रकरणी यापूर्वी अटक केली होती. त्यावेळी पुण्यात भोसले यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर शोध मोहिम राबवली होती.

… नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

 पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांना दोन दिवस नजरकैदेत ठेवण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले.  याप्रकरणी सीबीआयने भोसले यांची १० दिवसाची कोठडीची मागितली होती. मात्र भोसलेंवर करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला व त्यांची कोठडी सीबीआयला देण्यास विरोध केला. त्यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवून त्यांना जेवण, वैद्यकीय सुविधा देण्याची तयारी दर्शवली. यावेळी न्यायालयाने २८ आणि २९ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत त्यांचे वकील विजय अग्रवाल व धवल मेहता यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय ३० मे रोजी अविनाश भोसले यांना सकाळी ११ वाजता न्यायालयात घेऊन येण्यास सांगण्यात आले. भोसलेंच्या कोठडीला विरोध करून दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआयला सोमवापर्यंत वेळ देण्यात आला आहे. तोपर्यंत भोसलेंना बीकेसीच्या सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhosale accused embezzling arrested yes bank dhfl case ysh
First published on: 28-05-2022 at 01:36 IST