सीबीआयने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा आणि अंतरिम संरक्षण मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत.

आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरूख खानने समीर वानखेडेंना केलेल्या टेक्स्ट आणि व्हॉट्सअॅप मेसेजचे स्क्रिनशॉट याचिकेबरोबर जोडण्यात आले आहेत. यानुसार आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांचं संभाषण झालं होतं. यात शाहरूखने आर्यनच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंकडे सहकार्याची विनंती केल्याचा उल्लेख आहे.

nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Chief Minister eknath shinde order on BJPs letterhead ruled illegal by High Court
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…
bombay hc decision on petition filed by congress mla ravindra dhangekar over Development works in Kasba Constituency pune news
उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कसब्याच्या वाट्याला ‘भोपळा’च?

शाहरूख-वानखेडेंमधील चॅटमध्ये नेमकं काय?

वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत मोठा गौप्यस्फोट केला. शाहरूखने केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉटही न्यायालयासमोर ठेवला. यानुसार, शाहरूख खान समीर वानखेडेंना म्हणाला की, कृपया मला कॉल कर. मी आर्यन खानचा वडील म्हणून तुझ्याशी बोलेन. तू चांगला माणूस आहे, एक चांगला पतीदेखील आहेस आणि मीदेखील.

“मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला…”

“कायद्यात राहून माझ्या कुटुंबासाठी मी तुझ्याकडे मदत मागत आहे. मी तुझ्याकडे भीक मागतो. माझ्या मुलाला तुरुंगात जाऊ देऊ नको. तुरुंगात गेल्यामुळे माणूस खचून जातो. तू मला वचन दिलं आहेस की, माझ्या मुलाला बदलून टाकशील. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया कर. माझ्या मुलाला घरी पाठव. मी तुझ्याकडे एक वडील म्हणून भीक मागतो,” असं शाहरूखने म्हटलं.

हेही वाचा : समीर वानखेडेंचे मुंबईत चार फ्लॅट्स, पाच वर्षांत सहा परदेश दौरे; अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे!

“”शाहरूख मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो”

यावर चॅटमध्ये समीर वानखेडे म्हणतात, “शाहरूख खान मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो. जे होईल ते चांगलं होईल. तू तुझी काळजी घे.”