scorecardresearch

मुंबई : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; ट्रक चालक अटकेत

पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर-रमाबाई कॉलनी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

bike accident in ghatkopar,
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

भरधाव वेगात असलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर परिसरात घडली. या अपघातानंतर पूर्व द्रुतगती मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर-रमाबाई कॉलनी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. घाटकोपरहून एक दुचाकीस्वार चेंबूरच्या दिशेने जात असताना त्याला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाटकोपरहून शीवच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पंतनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दुचाकी आणि ट्रकला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन ट्रक चालकाला अटक केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 20:23 IST