गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शनचे आरोप केले असताना नवाब मलिक यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांचा निषेध करण्यासाठी आज मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. तसेच, नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहन देखील करण्यात आलं.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला. शहावली खान आणि सलीम पटेल यांचे अंडरवर्ल्डशी आणि मुंबई बॉम्ब ब्लास्टशी संबंध असताना त्यांच्याशी नवाब मलिक यांनी व्यवहार केले आणि साडेतीन कोटींची जमीन कवडीमोलाने विकत घेतली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर आज नवाब मलिक यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यासंदर्भात आता भाजयुमोकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.
“बनवाट नोटा या १४ कोटींच्या नव्हे तर..”; नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचे प्रत्त्युत्तर
आज दुपारी मंत्रालयाबाहेर मोठ्या संख्येने भाजयुमोचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात जोरजोरात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. तसेच, यावेळी नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं. यावेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तातडीने काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन जमावाला पांगवण्यासाठी कारवाई सुरू केली.
“कशाला उगाच वजन द्यायचं ”, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांना आवरेना हसू
नवाब मलिक यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप
आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिदेत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्या अधिकाऱ्याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. २००८ मध्ये आलेला अधिकारी १४ वर्षे मुंबईतच आहे यामध्ये काय कारण आहे. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले? मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही. तुम्ही हैदर आजम नावाच्या एका नेत्याला मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवले होते की नाही. हैदर आजम बांग्लादेशातल्या लोकांना मुंबईत आणण्याचे काम नाही करत का? हैदर आजमची दुसरी पत्नी जी बांग्लादेशी आहे ज्याची चौकशी मालाड पोलिसांनी केली होती. पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून ते प्रकरण दाबण्याचे काम तुम्ही केले होते की नाही. तुमच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रात वसुलाची काम होत होते की नाही. मुंबईच्या बिल्डरांच्या जागेचे भांडणवरुन पोलिसांत तक्रार करुन वसुली केली जात होती की नाही. जमिनींच्या मालकांना पकडून आणून त्या आपल्या नावावर केल्या जात होत्या की नाही. तुमच्या कार्यकाळात परदेशातू कुख्यात गुंड फोन करायचे, असे मलिक म्हणाले.