राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाविरोधात सोशल मीडियावर मोहिम उभारली आहे. वाढत्या महागाईवर विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला अडचणीत पकडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. २०१४ च्या निवडणूकीत भाजपाने आधिक प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला होता. आता विरोधकांनीही सोशल मीडियाचा वापर वाढवला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वॉर सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर जबाव दो असा प्रश्न विचारत भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या पुन्हा एकदा करत एकाच वेळी सर्व नेत्यांचे ट्विट कसे पडतात असा प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं देऊन टाका. आता मशीनरूपी तुमच्या ट्विट्सवर महाराष्ट्रातील जनता कसा काय विश्वास ठेवणार? असो पण, किमान हे रहस्य जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, तेव्हा सांगूनच टाका…असा प्रश्नही भाजपाकडून विचारण्यात आला आहे.
होत असे आहे की,काल आणि आज सकाळी बरोबर 9 वाजता 16 हँडल्सवरून (इतरही अनेक असतील) ट्विट केले गेले. सारेच सन्माननीय, सुप्रियाताई, नवाब मलिक, जयंतदादा, अजितदादा, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हेमंत टकले, भास्कर जाधव, शशिकांत शिंदे,सचिन अहीर वगैरे #NCPtweetScam
— महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) September 7, 2018
२०१९ मध्ये होणाऱ्या निवडणूकीचा रणधुमाळ प्रत्येक्षात सुरू व्हायला वेळ असला तरी त्याची रंगीत तालीम सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’आहे, हे तर आम्हाला ठावूक आहे,पण त्याची टिक-टिक किती कृत्रिम आहे,याचे हे घ्या पुरावे!राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांचे ट्विटर हँडल्स मशिनने चालतात की एकाच वेळी सारे नेते आदरणीय साहेबांपुढे बसून ट्विट करतात,प्रश्न पडला#NCPtweetScam pic.twitter.com/DEEL46atee
— महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) September 7, 2018
या सर्व ट्विटसमध्ये काना, मात्रा, वेलांटीसह मजकूर एकच, फोटो एकच, तारीखही एकच आणि वेळही एकच, सकाळी 9 वाजता. त्यांच्या सरकारला तर विश्वसनीयता नव्हतीच. पण, आम्ही असे समजत होतो, की, हे सारे सन्माननीय नेते किमान ‘ट्विटर’वर तरी विश्वसनीय असतील. पण, आज तोही भ्रमनिरास झाला.#NCPtweetScam
— महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) September 7, 2018