मुंबई : भाजपचे नेते, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांनी निवडणूक प्रचार काळात जनसामान्यांमध्ये मिसळताना आणि झोपडपट्ट्यांमध्ये फिरताना महागड्या गाड्या व राडोसारखी महागडी घड्याळे आदी न वापरता साधी राहणी ठेवण्याच्या सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या मुंबईतील नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईत महायुतीच्या सहाही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नड्डा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक घेतली. त्यास व्यवस्थापन समितीत असलेल्या वेगवेगळ्या ३६ विभागाचे प्रमुख, भाजपचे सर्व आमदार व खासदार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातच सर्व पदाधिकारी व नेत्यांना साधी राहणीमान ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधकांनी केलेले आरोप लगेच खोडून काढून त्यांना प्रत्युत्तर देण्यात यावे.

BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता
S. Chokkalingam
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा पुण्यातील ‘आयएएस लॉबी’ला धक्का
Failure to resolve Bhandara-Gondia seats will goes to BJP or NCP due to Praful Patel
भंडारा-गोंदियात पेच फसला… प्रफुल्ल पटेलांनी मध्ये उडी घेतल्याने…

हेही वाचा >>> Rajyasabha Election : काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि केलेली कामे जनतेपर्यंत प्रभावी पद्धतीने पोचविण्यात यावीत. नवीन मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली असून त्यांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भेटी घेऊन प्रयत्न करावेत, अशा सूचना नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर स्थानिक जनतेचे प्रश्न व महत्वाचे मुद्दे नेत्यांनी सरकारपुढे उपस्थित करावेत आणि जे प्रश्न सोडवायचे राहिले असतील, तेही मार्गी लावावेत, अशा सूचना नड्डा यांनी केल्या.

निवडणूक प्रचार तयारी, नेत्यांच्या दौऱ्यांची आखणी, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर आणि अन्य मुद्द्यांवर नड्डा यांनी दोन स्वतंत्र बैठकांमध्ये तयारीचा आढावा घेतला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश आदी उपस्थित होते.

खासदार पूनम महाजन गैरहजर

तीन मतदारसंघांसाठी राष्ट्रीय अध्यक्षांची सभा असूनही खासदार पूनम महाजन गैरहजर होत्या. नड्डा यांचे विमानतळावर स्वागत आणि त्यांनी मुंबई भाजप कार्यालयात घेतलेल्या बैठकीस त्या उपस्थित होत्या. मात्र कुर्ला येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने त्या सभेला गेल्या नाहीत व त्यांनी नड्डा यांना त्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, महाजन यांनी कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बांधलेल्या मंदिराचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

केवळ विजयाची नव्हे, भाजपची विक्रमी मताधिक्यासाठी तयारी

मुंबई : मुंबईसह राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा आशिर्वाद देऊन हॅटट्रीक करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लोकसभा निवडणूक जिंकण्याची नव्हे, तर प्रचंड मताधिक्य मिळविण्याची तयारी करीत आहोत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी येथे केले. भाजप ३७० आणि रालोआ (एनडीए) ४०० हून अधिक जागांवर विजय मिळवून नवीन विक्रम करेल, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.

उत्तर, उत्तर-मध्य आणि उत्तर-पश्चिम अशा तीन लोकसभा मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांचे संमेलन अंधेरी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

मुंबईने मोदींवर भरभरून प्रेम केले आहे व मतेही दिली आहेत. मोदी सरकारच्या पाठिंब्यामुळेच अटल सेतू, मेट्रोसह मुंबईकरांसाठी अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मोदी यांचा विकासाचा मार्ग असून काँग्रेस व राहुल गांधी देश तोडण्याचे काम करीत आहे. विरोधकांची आघाडी ही भ्रष्टाचारी व घराणेशाही जपणाऱ्यांची आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.