आर्यन खान प्रकरणावरुन सध्या राज्यात खळबळ माजली आहे. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि इतरांवर कारवाई करत ताब्यात घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेत्यांकडून टीका केली जात असून महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले जात आहेत. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील यावरुन टीका करत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले आहेत.

“सर्वज्ञानी जनाब संजयजी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुस्लिम आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ?,” अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे.

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?

“महाराष्ट्रात बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसे की कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळालेला नाही. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होत आहे. एमपीएससीच्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जात आहे. रोज राज्यातील लहान मुली-महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. या सगळ्या विषयावरती आपल्याला भाष्य करायचं नाही. पण तुम्हाला एनसीबीसारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचं आहे. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे,” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

“नगरमध्ये हिंदुस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करणाऱ्यांची डोकी फोडण्यात आली. उलट तुमची यंत्रणा मात्र विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही?,” अशीही विचारणा त्यांनी केली. “जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पहायचा आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलिच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते असंही त्यांनी म्हटलं आहे.