संजय राऊतांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याविरोधात शिंदे गट-भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. या मुद्द्यांवरून आज विधानसभेतही मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं.

हेही वाचा – “राज्यात सरकार बदलताच २८ चोरांना क्लिनचीट, २०२४ मध्ये सगळ्यांचा…”; संजय राऊतांचा शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल!

BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…

“विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार राऊतांना कोणी दिला?”

यासंदर्भात बोलताना भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले, “संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. एखाद्याचा राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र, या विधिमंडळाचा अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विविमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे.”

हेही वाचा – SC Hearing on Maharashtra Political Crisis Live: आज सुनावणीचा पाचवा दिवस, नीरज कौल, जेठमलानी करणार युक्तिवाद!

“राऊत खरोखरच बोलले का? हे तपासण्याची गरज”

या आरोपानंतर विरोध पक्षनेते अजित पवार यांनीही शेलारांच्या मताशी सहमत असल्याची प्रतिक्रिया दिली. “आपण कोणत्याही पक्षाचे असतो, तरी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण करतो. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कोणालाही चोर म्हणण्याचा अधिकार नाही. मी काही वेळापूर्वी यासंदर्भातील बातमी वाचली. खरं तर आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे. राजकीय मतभेद बाजुला ठेऊन हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मात्र, संजय राऊत खरोखरच बोलले का? हे सुद्धा तपासण्याची गरज आहे”, असे ते म्हणाले.

संजय राऊतांविरोधात कारवाईची मागणी

दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांविरोधात हक्कभंगांची कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाचा अपमान करणारे उद्गार काढले आहेत. त्यांनी विधिमंडळाला थेट चोरमंडळ म्हटलं आहे. त्यामुळे राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासंदर्भात मी पत्र दिलं आहे, अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली.