काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं होतं. यानंतर नाना पटोले यांनी आपण एका गावगुंड मोदीबाबत बोलत होतो असा दावा केला होता. पोलिसांनी या गावगुंडाला अटक केली आहे. मात्र याबाबत बोलताना नाना पटोले यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. ज्याची बायको पळून जाते, त्याचं नाव मोदी ठरतं असं नाना पटोले म्हणाले आहेत. यावरुन भाजपाकडून राज्यभरात आंदोलनं केली जात आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावरुन संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ज्याची बायको पळून जाते, त्याचं नाव मोदी ठरतं”

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर हायकमांडने झापल्यावर गावगुंड समोर आणला असा आरोप केला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, “गावगुंडाला गावगुंड दिसणार आहे. ते आता त्यांना दिसतच आहे. त्यांची कशी अवस्था झालीय हे सर्वांना माहिती आहे. लोकं भाजपावाल्यांवर हसत आहेत. ज्याची बायको पळून जाते, त्याचं नाव मोदी ठरतं. असं झाल्यानंतर काय बाकी राहिलं आहे.”

ज्याची बायको पळून जाते त्याचं नाव मोदी वक्तव्यावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे…”

फडणवीसांची टीका –

“नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. नागपुरात त्यांनी भाजपामधील उमेदवार घेतल्यानंतर त्याची काय अवस्था झाली हे आपण पाहिलं. भंडारा, गोंदियात काय अवस्था झाली हेपण पाहिलं. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मी कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवा अशी विनंती करेन,” अशा शब्दांत फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

नाना पटोलेंचं स्पष्टीकरण –

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर एका गावगुंडाबाबत असं बोललो होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं. आम्हाला पंतप्रधानपदाचा सन्मान माहिती आहे, भाजपाला ते माहिती नाही. मनमोहन सिंग यांच्याविरोधात ते काय बोलत होते हे सर्वांना माहिती आहे. एका गावगुंडाचं भाजपा इतकं समर्थन का करत आहे? हा प्रश्न जनतेसमोर आहे. हा विषय संपला असून जनतेचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“गावगुंडाने माध्यमांसमोर येऊन मला मोदी का म्हणतात यासंबंधी सांगितलं, तेच वाक्य मी म्हटलं. बदनामी करण्याचं काम थांबवा असं मी सांगितलं असून गावगुंडाचं समर्थन करण्याचं कारण काय? पुतळे जाळायचे असतील तर भारतमाता की जय म्हणून देश विकणाऱ्यांचे जाळा. बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे जाळा, शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारणाऱ्या केंद्रातील मंत्र्याच्या विरोधात जाळा. देशात बेरोजगाऱी असून शेतकरी, व्यापारी आत्महत्या सुरु आहेत. ज्यांनी या व्यवस्थेला निर्माण केलं त्यांचे पुतळे जाळले पाहिजेत. पण मूळ मुद्याला भाजपा फिरवण्याचं काम करत असून देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ओळखत आहे,” असंही नाना पटोले म्हणाले.

“काँग्रेस नेहमी गावगुंडाविरोधात राहणार. ते त्याचा अर्थ काय लावत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. गावगुंड बोलला असून आतो तो विषय आता थांबवला पाहिजे. माझे पुतळे जाळण्याची, उद्धार करण्याची प्रक्रिया किती दिवस सुरु ठेवायची ते ठेवावं. पोलीस यासंबंधी कारवाई करतील. पण राज्यात करोनाची स्थिती असतानाही आंदोलन कशाला? गावगुंडासाठी इतकं प्रेम कशाला?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

जो न्याय नारायण राणेंसाठी होता तोच नाना पटोलेंसाठी हवा या भाजपाच्या मागणीवर ते म्हणाले की, “नारायण राणेंचं आणि माझं वाक्य काय होतं? मी प्रधानमंत्र्यांविरोधात बोललो नसून गावगुंडाबाबत बोललो. तो गावगुंड समोर आला असताना मग बालहट्ट कशासाठी? मूळ प्रश्नापासून लोकांना दूर नेलं जात आहे. सुसंस्कृत पक्षाचे लोक आहात तर मग महिला, मुलींचा अपमान करणाऱ्यांना काही बोलणार नाही का? आत कुठे गेली अक्कल? माझ्या वाटेला आल्याने त्यांचा फायदा होत असेल तर यावं. काँग्रेस गावगुडांच्याविरोधात असून कायम राहणार”.

“भाजपाची जी बदनामी होत आहे ती झाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. बेटी बचाव बेटी पटाव हे वाक्य त्यांना मान्य आहे का?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis congress nana patole pm narendra modi sgy
First published on: 24-01-2022 at 15:08 IST