दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट-भाजपा आमने-सामने आहेत. स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी एक मोठी मागणी केली असून हे स्मृतीस्थळ सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. दरम्यान त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

प्रसाद लाड यांची मागणी काय?

“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक कोणत्याही एका कुटुंबाचं होऊ शकत नाही. महाराष्ट्रासाठी गौरव असलेलं हे स्मारक महाराष्ट्र शासनाने आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे, अशी मी सरकारकडे मागणी करत आहे,” असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसंच देखभालीसाठी समिती स्थापून त्यात ठाकरे कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची नेमणूक करावी, असा सल्लाही त्यांनीही दिला आहे.

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

“हे स्मारक कोणाचीही खासगी संपत्ती नाही. ते कोणत्याही एका कुटुंबाचं नाही. ते राज्य सरकारचं स्मारक आहे. ती जमीन, त्यासाठी लागणारा निधी सरकारचा आहे. हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे. सन्मान म्हणून ठाकरे कुटुंबीयांपैकी एक किंवा दोन सदस्यांना या स्मारक समितीवर घ्यावं,” अशी मागणी त्यांनी केली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकामावर अखेर हातोडा

“खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे सर्वांना माहिती आहे. संजय राऊतांनी सर्वात प्रथम उद्धव ठाकरेंना आपलं खंजीर लपवून ठेवण्यास सांगावं. उद्धव ठाकरेंनीच खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. एकनाथ शिंदे मर्दासारखे लढले आहेत. हिंदुत्व सोडणाऱ्या गद्दारांना त्यांनी आपली जागा दाखवून दिली,” असं प्रत्युत्तरही त्यांनी संजय राऊतांना दिलं.

फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी स्मारकाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसाद लाड यांच्या मागणीवर ते म्हणाले की “पक्षाची अशी कोणतीही मागणी नाही. वैयक्तिकदृष्ट्या कोणालाही असं वाटत असेल तर ते शक्य आहे. पण भाजपाने अशी कोणतीही मागणी केलेली नाही. बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं असून, त्यांचंच राहणार आहे”.

“खासगी बैठकांसाठी या स्मारकाचा वापर होऊ नये अशी सर्वांचीच आशा आहे. एखादं राष्ट्रीय स्मारक उभं राहिल्यानंतर काही नियम असतात, त्यांचं पालन होईल अशी अपेक्षा आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.