भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हत्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. “सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केलीय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत.

केशव उपाध्ये म्हणाले, “’सचिन वाझे काही लादेन आहे का?’ असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिलं पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते.”

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

“एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून?”

“राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यात हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे,” असं केशव उपाध्ये यांनी सांगितलं.

हेही वाचा : “देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं…”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

“आता पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का?”

“बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचं उत्तर द्यावं,” अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली.