नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील अनधिकृत टॉवर्सचा मुद्दा उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचं विशेष ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले “मुंबईत भोगवटा प्रमाणपत्र (OC) न मिळालेले शेकडो टॉवर्स आहेत. या ठिकाणी पाच ते १० वर्षांपासून मध्यमवर्गीय राहत आहेत. बिल्डरने या ठिकाणी अनधिकृतपणे अतिरिक्त मजले बांधले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे, २५ हजाराहून फ्लॅटधारक ओसी न मिळाल्याने चिंतेत आहेत. त्या बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्टाचारी अधिकारी यांचं विशेष ऑडिट करावं अशी मागणी आहे”.

इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
parbhani lok sabha marathi news, shivsena parbhani lok sabha marathi news, sanjay jadhav parbhani loksabha marathi news
पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

“मुंबई आणि एमआरआरमधील अशा प्रकारच्या अनधिकृत टॉवर, मजल्यांचं विशेष ऑडिट करण्याचे आदेश द्या. महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी, बिल्डर्स यांच्यावर कारवाई करा. २५ हजाराहून अधिक मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचं रक्षण करा अशी मागणी मी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे केली आहे,” अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.

यावेळी किरीट सोमय्या यांना प्रताप सरनाईक यांच्या विहंग इमारतीसंबंधी करण्यात आलेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले “मला कोणत्याही एका बिल्डरचं नाव घ्यायचं नाही. पण ही गोष्ट खरी आहे की, २०१० मध्ये लोक राहायला गेले, पण २०२२ पर्यंत ओसी मिळाली नव्हती. मी विषय उचलल्यानंतर दंड ठोठावण्यात आला होता, जो मागील सरकारने माफ केला. आता विहंग गार्डनच्या लोकांना ओसी मिळाली आहे”.

Twin Towers demolition: जमीनदोस्त ट्विन टॉवर्समुळे ‘सुपरटेक’ कंपनीचं ५०० कोटींचं नुकसान, पाडकामासाठी २० कोटींचा खर्च

“मध्यमवर्गीय गाळेधारक आणि फ्लॅटधारक यांचं संरक्षण झालंच पाहिजे, यासाठी माझं एकनाथ शिंदे, फडणवीसांना आवाहन आहे. ठराविका बिल्डरला, फ्लॅटधारकांना माफी, असा भेदभाव करु नये,” असंही त्यांनी सांगितलं.

“किशोरी पेडणेकर यांनी बेनामी गाळ्यांचा ताबा घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा मी एसआरए प्राधिकरणात जाऊन कारवाईची मागणी केली आहे. या आठवड्यात पुन्हा पाठपुरावा करणार. वरळीमध्ये अर्धा डझन बेनामी गाळे त्यांनी ताब्यात घेतले,” असा आरोप त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले “गेल्या गणेशोत्सवात मला विसर्जनाला जाताना थांबवण्यात आलं होतं. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला जाता येणार नाही असा आदेश देण्यात आला होता. १९ सप्टेंबरला इथेच थांबवलं होतं. सीएसएमटी स्थानकावरुन ट्रेन पकडून द्यायची नाही असा आदेश तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिले होते. कारण मी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी चाललो होतो. मी न्यायालयात गेलो असता पोलीस प्राधिकारणाने सरकारने किरीट सोमय्यांची अडवणूक केली ती बेकायदेशीर होती असा आदेश दिला आहे. मुंबई पोलिसांनी जाहीरपणे माझी माफी मागितली आहे”.