ठाण्यात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) युतीत असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. अशातच आता भाजपा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे गटावर भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला आहे. तसेच एका अधिकाऱ्यामुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचं सांगत तो अधिकारी आकाशातून पडला आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. ते शनिवारी (१० जून) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

नरेंद्र पवार म्हणाले, “हा खरं भाजपा कार्यकर्त्यांचा रोष आहे. त्यांनी त्या दिवशी त्यांची भावना व्यक्त केली. ती या विषयावरची बैठक नव्हती. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ वर्षे पूर्ण झाले. त्याअनुषंगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कॅबिनेट मंत्री स्वतः बैठका घेत आहेत.”

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

“…तोपर्यंत आम्ही कोणतंही सहकार्य करणार नाही”

“श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यात रवी चव्हाण यांचं योगदान काय आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनाही माहिती आहे. त्या दिवशी कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे विषय मांडला. त्यामुळे रवी चव्हाण आणि आमचा नाईलाज झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांची भावना ऐकून घेणं गरजेचं होतं. त्याच भावनेतून कार्यकर्त्यांनी ठराव केला की, जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतंही सहकार्य करणार नाही,” अशी माहिती नरेंद्र पवारांनी दिली.

“ते भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत”

नरेंद्र पवार पुढे म्हणाले, “सध्या त्या अधिकाऱ्यावर जुजबी कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्याची बदली केली पाहिजे. त्याला इथं ठेवण्याची काय गरज आहे. तो अधिकारी इतका मोठा आहे का, आकाशातून पडला आहे का. त्याला यांनी केवळ सक्तीच्या रजेवर पाठवलं. त्याची बदली केली पाहिजे. मात्र, ते भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर आणखी मिठ चोळत आहेत.”

“त्या अधिकाऱ्यासाठी युतीतील वातावरण गढूळ”

“त्या अधिकाऱ्यासाठी युतीतील वातावरण गढूळ होत आहे. त्यावर उपाययोजना करून त्या अधिकाऱ्याची बदली केली पाहिजे. मी स्वतः जिल्हाध्यक्षांशी बोललो आहे. हा जाहीर बैठकीचा विषय नाही. त्या दिवशी अनपेक्षितपणे ठराव आला आणि पारित केला गेला. मात्र, ती कार्यकर्त्यांची भावना होती,” असं मत नरेंद्र पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : श्रीकांत शिंदेंची खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी; भाजपा नेते रवींद्र चव्हाण म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांशी…”

“आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेळ घेऊ”

“आम्ही ठरवलं आहे की आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेळ घेऊ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेऊ. त्यांच्यासमोर हा विषय मांडू. त्यांनी यावर आम्हाला न्याय द्यावा अशी आमची सर्वांची भावना आहे,” असंही नरेंद्र पवारांनी नमूद केलं.