scorecardresearch

Premium

खिचडी वितरण कथित गैरव्यवहार, आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

करोना काळात कामगारांना वाटप करण्यासाठी महापालिकेकडून खिचडी करण्यात आली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

BJP Leader Kirit Somaiya, Khichdi Scam Exposed by Kirit Somaiya
खिचडी वितरण कथित गैरव्यवहार, आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : कोरोना काळात महापालिकेकडून करण्यात आलेल्या खिचडी वितरणाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सुजीत पाटकर यांच्यासह सहा जणांविरोधात हा गुन्ह दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे, आदी कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सव मल्टी सर्व्हिसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त, इतर पालिका अधिकारी व संबंधीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मुळात मराठा समाजाने…”

Nitish Kuma
“मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल
pimpri-chinchwad-PCMC-1_ae7929
पिंपरी : ‘एसटीपी’वर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सल्लागार नेमण्यास गृहनिर्माण संस्थाधारकांचा विरोध, निर्णय रद्द करा, अन्यथा…
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
RPF Recruitment 2024
RPF अंतर्गत लवकरच २००० पदांची मेगाभरती! १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा कुठे आणि कसा करायचा अर्ज

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ लावणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. याप्रकरणी महापालिका अधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्तींची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. करोना काळात कामगारांना वाटप करण्यासाठी महापालिकेकडून खिचडी करण्यात आली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. महापालिकेत करोना काळात १६० कोटींचा खिचडी गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader kirit somaiya exposed khichdi scam during covid case registered by economic offence wing mumbai print news css

First published on: 02-09-2023 at 11:10 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×