“पिक्चर तो अभी शुरू हुई है, कल…”, भाजपा नेत्याचा पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांचा पर्दाफाश करण्याचा इशारा

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर आता भाजपा नेते मोहित कुंबोज यांनी आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलंय.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर आता भाजपा नेते मोहित कुंबोज यांनी आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलंय. यात त्यांनी नवाब मलिकांचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिलाय. मोहित कुंबोज यांनी ट्वीट करत म्हटलं, “पिक्चर तो अभी शुरू होई हैं, कल xx करते है आप को” असं म्हटलंय. तसेच एक निवेदन जारी करत शनिवारी (६ नोव्हेंबर) ११ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं.

आपल्या निवेदनात मोहित कुंबोज यांनी म्हटलं, “मी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता एका खूप महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा पर्दाफाश होईल.”

दरम्यान याआधी नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत मोहित कुंबोजचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. त्यावेळी कुंबोज यांनी मलिक यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. तसेच आपण या धमक्यांना घाबरत नसल्याचं म्हटलं होतं.

नवाब मलिक यांचे मोहित कुंबोजवर नेमके काय आरोप?

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. तसेच एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मुंबईमधील भाजपाच्या युवा विभागाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या मेहुण्याचाही समावेश असल्याचं म्हटलं.

हेही वाचा : नवाब मलिकांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार – मोहित कंबोज

१३०० लोक असणाऱ्या जहाजावर तुम्ही छापा टाकला. १२ तास सुरु असलेल्या छाप्यात ११ लोकांना ताब्यात घेत एनसीबीच्या कार्यालयात नेलं. तीन जणांना का सोडलं? याचं उत्तर एनसीबीला द्यावं लागेल असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मलिक यांनी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भाजपाच्या नेत्यांनी फोन करुन या तिघांना सोडण्यास सांगितल्याचा आरोपही केलाय. सोडण्यात आलेल्या लोकांमध्ये आमीर फर्निचरवाला, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाबा यांचा समावेश होता असं मलिक म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp leader mohit kumboj going to take pc claim big expose of maharashtra nawab malik

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या