ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधात निवडणूक लढण्याचे थेट आव्हान दिले आहे. शिंदे वरळीतून लढण्यास तयार नसतील, तर मी ठाण्यातून लढतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. या आव्हानानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झालेला आहे. असे असतानाच आता एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. याच कार्यक्रमात भाजपाचे नेते नितेश राणे यांनीदेखील दमदार भाषण केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”

“आज मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचा (७ फेब्रुवारी) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आज आपण उपस्थित राहून सर्वांनी आम्हाला प्रेम दिले आहे. आमच्या सरकारवर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर तुम्ही विश्वास दाखवत आहात. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच त्यांच्या स्थानिक आमदार मुलाला हा सत्कार घेता आला असता. शेवटी हे सगळं प्रेम मिळवण्यासाठी नशीब लागतं. कर्तृत्व लागतं. आपल्या स्वत:च्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची आपल्यात ताकद नसेल, हिंमत नसेल तर ती आमदारकी फक्त मिरवायला ठेवली आहे का?” अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर संभ्रम वाढला; म्हणाले “राजीनामा आहे की…”

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीदेखील आदित्य ठाकरे तसेच उद्धव ठाकरेंवरही टीका केली. “आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. तुमचे हात स्वच्छ असतील तरच आमच्याशी संघर्ष करा. मुंबईकरांवर अन्याय करून तसेच तुमचे हात रक्ताने माखलेले असतील, तर आमच्याशी संघर्ष करण्याची भाषा करू नका,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”

“आता मुंबईकरांना न्याय देणारं सरकार आहे. आज संवेदनशील सरकार आहे. तुमचा आशीर्वाद एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठेवा. मुंबईचे सर्व प्रश्न आम्ही पुढील पाच वर्षांत सोडवल्याशिवाय राहणार नाही,” असे आश्वासनही आशिष शेलार यांनी दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader nitesh rane criticizes uddhav thackeray and aditya thackeray in worli rally prd
First published on: 07-02-2023 at 21:45 IST