भाजपा नेते राम कदम यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना टोला लगावला आहे. काल मुंबईतील दादर भागात एका रस्त्यावरील गटरात गाय पडली होती, त्यानंतर तिला काढण्यासाठी बीएमसीच्या अग्निशम दलाच्या जवांनाना आणि कर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागली. अखेर बराच वेळानंतर गायीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. या गटाराचे झाकण गायीने स्वत: उघडल्याचे मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं समोर आलं. यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांना टोला लगावला आहे.

“नासा वैज्ञानिकांनी विशेष मागणी करून मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना सल्ला घेण्यासाठी पाचारण केले. आहो खर आहे . त्यांचा नवीन शोध पाहा भ्रष्ट मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी म्हणतात, गायीने स्वतः रस्त्यावरील गटाराचे झाकण उघडले.” असं राम कदम यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

मुंबईतील दादर भागात असलेल्या भवानी शंकर रोडवरील कबुतर खाना परिसरात काल (सोमवार) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गाय ड्रेनजमध्ये पडल्याची घटना घडली. गाय ड्रेनेज टाकीच्या झाकणावर उभी होती, त्यावेळी ड्रेनेजचे झाकण सरकलं आणि गाय टाकीत पडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती. त्यानंतर घटनास्थळी बीएमसीचे अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचारी दाखल झाले होते व गायीला सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. बराच वेळानंतर गायीला ड्रेनेजमधून बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान ड्रेनेजमध्ये अडकलेल्या गायीला चारा,पाणी देखील देण्यात आलं होतं.