मुंबई : पब, पेग आणि पार्टी. हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारची संस्कृती असल्याचे आणि हे सरकार विदेशी मद्याचे पुरस्कर्ते असल्याचे टीकास्त्र भाजप नेते अ‍ॅड. आशीष शेलार यांनी रविवारी सोडले.

विदेशी मद्यावरील कर मोठय़ा प्रमाणावर कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सडकून टीका करताना शेलार म्हणाले, राज्य सरकारचे प्राधान्य व प्राथमिकता कशाला आहे, हे निर्णयातून दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल यावरील करात सवलत देऊन जनतेला दिलासा दिला. राज्य सरकारनेही करकपात करून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. पण इंधनावरचे कर कमी करून जनतेला दिलासा देण्याऐवजी राज्य सरकारने विदेशी मद्यावरील कर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के इतका कमी केला. हे सरकार पब, पेग व पार्टीचे संस्कृतीचा सुरुवातीपासूनच पुरस्कार करीत असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.