भाजप आमदार प्रसाद लाड यांनी इंधन दरातील कपातीवरून महाविकासआघाडीवर निशाणा साधलाय. तसेच केंद्राप्रमाणे राज्य सरकारने देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करून दाखवाव्यात अशी मागणी केलीय. प्रसाद लाड यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी आघाडीचे नेते १०० कोटी रुपयांच्या खाली बोलतच नसल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद लाड म्हणाले, “जे १०० कोटींच्या खाली बोलतंच नाहीत, त्यांना लिटर मागे ५ आणि १० रुपये कमी केल्याची किंमत काय कळणार? केंद्राकडे सतत बोट दाखवणाऱ्या आघाडी सरकारने पण पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करून दाखवाव्यात!”

हेही वाचा : GST : शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…!”

“राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवर १२ रुपयांनी सवलत द्यायला हवी”

केंद्रापाठोपाठ भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्यावर महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका करत  इंधनदरात सवल देण्याची मागणी केली आहे.

“केंद्र सरकारने या दिवाळीनिमित्त संपूर्ण देशासह महाराष्ट्राला दिवाळी भेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलवर सूट दिली आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे संजय राऊत बोलतात पाच आणि दहा रुपयांनी काय होते. केंद्र सरकारने दर कमी करुन महाराष्ट्राला भेट दिली आहे. तर आपण महाराष्ट्र सरकारला सांगावे की दिवाळी भेट म्हणून इंधनावरुन कर आकारल्यानंतर येणारा जो १२ रुपये नफा आहे तो कमी करुन सवलत द्यायला पाहिजे. संजय राऊत आपण केंद्रावर प्रत्येक गोष्टीवरुन टीका करता पण आपल्या महाराष्ट्रात एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. दिवाळीच्या दिवशी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आपण का पूर्ण करत नाही,” असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla prasad lad criticize mva government over petrol diesel fuel price pbs
First published on: 05-11-2021 at 08:15 IST