ऐरोली येथे नवीन कचराभूमीस भाजपचा विरोध

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलूंड, कांजूर, देवनार येथे असणारी कचराभूमी हटविण्याची मागणी

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलूंड, कांजूर, देवनार येथे असणारी कचराभूमी हटविण्याची मागणी स्थानिकांकडून होत जात असतानाच आता भाजपने ऐरोली येथे नवीन कचराभूमी निर्माण करण्यास विरोध केला आहे. तसेच, जर मुंबई महापालिकेने अशी कचराभूमी ऐरोली येथे सुरू केल्यास भाजप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपचे खासदार किरीट सोमैय्या यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन दिला. मुंबईच्या पूर्व उपनगरांत मुलूंड, कांजूर, देवनार आदी भागात कचराभूमी असून त्याचा स्थानिक नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास होत आहे. त्यामुळे आता पुन्हा मुलूंडनजीक ऐरोली येथे कचराभूमी उभारून येथील नागरिकांचे जीवनमान खालावेल असे आपणांस वाटत नाही का? असा सवाल सोमैय्या यांनी उपस्थित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp opposes for new waste land