ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांचा प्रवेश झाला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. भूषण देसाईंच्या प्रवेशाचं वृत्त जाहीर होताच थेट सुभाष देसाईंबाबतही चर्चा सुरू झाल्या. मात्र, त्यावर सुभाष देसाईंनी आपली निष्ठा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या मुद्द्यावरून राजकीय दावे चालू असून आता भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपामधूनच विरोध होताना दिसत आहे. यासंदर्भातलं एक पत्रही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलं आहे.

“भ्रष्ट नेत्यांच्या मुलांना प्रवेश देऊ नका”

एकनाथ शिंदे यांना भाजपाचे गोरेगावमधील विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी पत्र लिहिलं आहे. यामध्ये भ्रष्ट नेत्यांच्या मुलांना प्रवेश देऊ नका, अशी मागणी करण्यता आली आहे. संदीप जाधव यांनी टीव्ही ९ वर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सामाजिक क्षेत्रात कवडीचीही किंमत नसलेले चिरंजीव भूषण सुभाष देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हे अतिशय वेदनादायक आहे. कारण ज्या माणसानं कधीही सामाजिक बांधिलकी जपली नाही, सामाजिक क्षेत्रात एक इंचाचंही काम नाही, फक्त भ्रष्टाचाराने हात बरबटलेलं व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे, अशा व्यक्तीला शिवसेना शिंदे गटानं प्रवेश दिला. यावर गोरेगावकरांच्या तीव्र भावना आहेत. आमचा याला विरोध आहे”, असं संदीप जाधव म्हणाले आहेत.

Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

सुभाष देसाईंनी व्यक्त केलं दु:ख

दरम्यान, भूषण देसाईंनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुभाष देसाईंनी दु:ख व्यक्त केलं आहे. “माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही”, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाईंनी दिली आहे.

“माझा मुलगा भूषण देसाईने शिंदे गटात जाणं ही माझ्यासाठी..” सुभाष देसाईंनी पत्रातून व्यक्त केल्या भावना

“शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.