मुंबई : पंचायत ते संसदेपर्यंत सर्व आपल्याच ताब्यात ठेवण्याचे भाजपचे धोरण आहे. ही पुढच्या घातक हुकूमशाहीची नांदी असून, त्यास काटशह देणे आवश्यक आहे. भाजपचे हिंदूत्व राजकारणासाठीच असून, शिवसेना मात्र हिंदूत्वासाठी राजकारण करते, असे स्पष्ट करत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लक्ष्य केल़े 

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान मंगळवारपासून सुरू होत असून, त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे खासदार व संपर्कप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला. या अभियानात शिवसेनेचे खासदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी गावपातळीवर जाऊन महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. याबाबत पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली़  आधी करोनाची साथ व नंतर शस्त्रक्रियेमुळे मुंबईत अडकून पडलो. पण, पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसैनिक जे एकदा ठरवतो ते करून दाखवतो. युवा सैनिकही बरोबर आहेत. आता महाराष्ट्र काय आहे, हे दिल्लीपर्यंत कळेल, असे ठाकरे म्हणाले. भाजप देशात भ्रमाचे राजकारण करत असून शिवसेनेला हिंदूत्वविरोधी ठरवण्यासाठी त्यांचे नेते विधाने करत असतात. मध्येच आता काही कारण नसताना ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीत येण्याचा विषय काढला. हा भाजपचाच कट आहे, असे ठाकरे म्हणाल़े 

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: ताठरही नाही की तडजोडवादी नाही.. वंचित बहुजन आघाडी तर संधीवादी!

शिवसेनेला हिंदूत्वविरोधी ठरवणारी भाजप काश्मीरमध्ये सत्तेसाठी अफझल गुरूला फाशी नको, म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्तींसह युती करते याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली. त्याचबरोबर काश्मीरमधून पंडितांना हुसकावले जात असताना तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या सरकारला भाजपचा पािठबा होता. व्ही. पी. सिंह हे पंतप्रधान झाल्यावर दिल्लीत जामा मशिदीत इमामाला भेटायला गेले तेव्हाही भाजप गप्प बसली. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा बंद करण्याची धमकी दिल्यानंतर एकटय़ा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मग हज यात्रेसाठी एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा देत दहशतवाद्यांना अंगावर घेतले, याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीमांबाबतची काही विधाने वाचून दाखवत आता यासाठी भाजप भागवतांच्या नावापुढे खान लिहिणार का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. सावरकरांवरून आम्हाला शिकवतात. पण, मोहन भागवतांनीच सावरकर मुस्लीमविरोधी नव्हते, तर त्यांनी उर्दूत गझल लिहिली असे म्हटले आहे. संघाच्या आणि आपल्या विचारात थोडी समानता आहे. पण, आम्ही काही केले तर वाईट आणि ते करतील ते चांगले हे भाजपचे धोरण योग्य नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

इस्लाम धोक्याच्या धर्तीवर भाजपचे लोक देशात हिंदूत्व धोक्यात असा भीतीचा बागलबुवा उभा करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत. तो दूर करावा लागेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यपालांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. वर्षभर होऊन गेले तरी विधान परिषदेवर १२ जणांची नियुक्ती केली नाही. हा सरकारचा अधिकार आहे, पण त्यास मंजुरी न देणे हा लोकशाहीचा खून आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर व भाजपच्या राजकारणावर केली.

मग, हिजबुल जनता पक्ष म्हणायचे का?’

’हिंदूत्वावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले. भाजपने अफझल गुरूला फाशी नको म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्तींशी युती केली होती़ 

’या घटनांनंतरही तुम्ही आम्हाला ‘जनाब सेना’ म्हणत असाल तर तुम्हाला पाकिस्तान जनता पक्ष किंवा हिजबुल जनता पक्ष म्हणायचे का, असा सवाल ठाकरे यांनी केला़ 

’भाजपचे हिंदूत्व हे कसे राजकीय थोतांड आहे, हे घराघरात जाऊन सांगा, असे आवाहनही ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल़े

एमआयएमशी युती अशक्यच

‘एमआयएम’ने महाविकास आघाडीत येण्याचा विषय काढला़  पण, हा भाजपचाच कट आह़े  औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या ‘एमआयएम’शी युती कदापि शक्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

निवडणुकीच्या तयारीला लागा

सत्ता आल्यानंतर निखाऱ्यावरची राख झटकून टाकून फुंकर मारून पुन्हा शिवसेनेचा निखारा पेटवण्याची गरज आहे. पदाधिकारी नसतील त्या ठिकाणी नियुक्तीसाठी यादी द्या. महिला, पुरुष, युवक-युवती हेरून त्यांना संधी दिली पाहिजे. जुन्या लोकांना त्यांचा आधार मिळेल. तरुणवर्ग हा बाळासाहेबांचा चाहता आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. कोणते मतदारसंघ किमान एकदा तरी जिंकलो, याची यादी तयार करायला हवी. मतदारसंघांची बांधणी सुरू करायला हवी. भाजपकडे असलेल्या मतदारसंघात चांगले कार्यकर्ते शोधून जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार मला सुचवा. तसेच सदस्य नोंदणी, मतदारनोंदणी याकडे लक्ष दिले पाहिजे. लोकसभा, विधानसभा व काही महापालिका वगळता आपण इतर निवडणुका फारशा गांभीर्याने घेत नाही. आता तसे चालणार नाही. सर्व निवडणुका गंभीरपणे लढवाव्या लागतील. भाजपने २०१४ मध्ये युती तोडत संघटनात्मक बांधणी केली तशीच आपल्यालाही करावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी- एमआयएमचा संगनमताने खेळ : फडणवीस

पिंपरी : ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीत येण्याची योजना मांडणे, महाविकास आघाडीने त्यावर व्यक्त होणे, हा त्यांच्यात संगनमताने सुरू असलेला खेळ आहे, अशी टिप्पणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमासाठी फडणवीस रविवारी मावळात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतच्या ‘एमआयएम’च्या प्रस्तावावर भाष्य केल़े  ‘शिवसेना अजान स्पर्धा भरवणार, ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असे तेच लिहिणार, वेगवेगळय़ा प्रकारे सगळय़ा गोष्टी तेच करणार आणि आरोप मात्र आमच्यावर करणार, असे त्यांचे सध्या सुरू आहे. सरकारमधील घटक पक्ष ‘एमआयएम’बरोबर जाण्याच्या विचारात आहेत. एकाने विचारणा करायची, दुसरीकडून प्रतिक्रिया व्यक्त करायची, हा खेळ सर्व मिळून खेळत आहेत,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.