bjp to hold 3 day state level meeting to discuss about upcoming elections in uttan zws 70 | Loksatta

भाजपची शुक्रवारपासून तीन दिवस चिंतन बैठक ; राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

केंद्रीय सरचिटणीस (संघटना) बी.एल. संतोष यांच्यासह काही वरिष्ठ केंद्रीय नेते या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपची शुक्रवारपासून तीन दिवस चिंतन बैठक ; राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यातील महत्त्वाचे राजकीय, सामाजिक विषय आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने विचारमंथन करण्यासाठी भाजपची राज्यस्तरीय चिंतन बैठक ७, ८ व ९ ऑक्टोबरला उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय सरचिटणीस (संघटना) बी.एल. संतोष यांच्यासह काही वरिष्ठ केंद्रीय नेते या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपची मूळ भूमिका, विचार आणि कालानुरूप घतले गेलेले निर्णय, देशांतर्गत राजकीय परिस्थिती आदींबाबत वेगवेगळय़ा सत्रांमध्ये तीन दिवस विचारमंथन होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मंत्री यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीतील नेते, राज्य पदाधिकारी, भाजपचे राज्यातील सर्व खासदार, आमदार आदी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवण्याचा निर्धार

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले असले तरी त्यात भाजपची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीस सामोरे जाताना या सरकारकडून पुढील काळात काय अपेक्षा आहेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाबरोबर आपली कशी व काय भूमिका असावी, भाजपची ध्येयधोरणे राबवीत निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून सरकारच्या कामगिरीचा प्रचार करावा, याबाबत विचारमंथन होणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गर्दी जमविण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न ; दसरा मेळाव्याची  तयारी

संबंधित बातम्या

मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक
‘कर्णाटक बँके’तून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
मुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
Shraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल
BCCI Selection Committee: जवळजवळ ठरलंच! आयपीएलवर आगपाखड करणारा खेळाडू होणार बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष
भान हरपून सायली संजीवने कॉफी शॉपमध्येच केलं असं काही की…; फोटो व्हायरल
“सैराटने मराठी चित्रटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…
रणबीर कपूरला करायचंय पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम; म्हणाला “अभिनेत्याला मर्यादा…”