scorecardresearch

केंद्रीय मंत्र्यांचे १७ लोकसभा मतदारसंघांत पक्षबांधणीसाठी दौरे

केंद्रीय मंत्र्यांची देशभरात लोकसभा प्रवास योजना सुरू असून पक्षबांधणीसाठी त्याचा उपयोग होत आहे.

केंद्रीय मंत्र्यांचे १७ लोकसभा मतदारसंघांत पक्षबांधणीसाठी दौरे
(संग्रहित छायाचित्र) photo source : लोकसत्ता डेस्क टीम

मुंबई : केंद्रीय मंत्र्यांचे राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांत भाजप पक्षबांधणीसाठी गुरुवारपासून दौरे सुरू झाले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे दिली.

केंद्रीय मंत्र्यांची देशभरात लोकसभा प्रवास योजना सुरू असून पक्षबांधणीसाठी त्याचा उपयोग होत आहे. त्या धर्तीवर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या १७ लोकसभा मतदारसंघांत प्रवास दौऱ्यांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे संघटना अधिक बळकट होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील. पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल.

नारायण राणे यांच्याकडे सांगली, रावसाहेब दानवे यांच्याकडे लातूर व मावळ, डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी व धुळे, डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिक आणि कपिल पाटील यांच्याकडे रावेर आणि सोलापूर या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. हे केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा दौरा करतील. त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम असतील.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 01:38 IST

संबंधित बातम्या