मुंबई : ‘ब्लॅकस्टोन’ उद्याोग समूह राज्यात ५ हजार १२७ कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार असून, त्यातून २७ हजार ५१० तरुणांना रोजगार मिळणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सरकार आणि ब्लॅकस्टोन समूहाच्या ‘एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स’ आणि ‘होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह येथे उद्याोग सचिव डॉ.पी.अनबलगन आणि ‘होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स’चे अध्यक्ष आर.के.नारायणन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, औद्याोगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, ब्लॅकस्टोन अॅडहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, ब्लॅकस्टोन अॅडव्हायझर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल उपस्थित होते.
हा करार राज्यातील प्रमुख औद्याोगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी करण्यात आला आहे.
नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे औद्याोगिक व लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. देशातील उत्पादन, वेअरहाउसिंग व पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी यातून एक सशक्त पायाभूत रचना निर्माण होईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दहा ठिकाणी उभारणी
या सामंजस्य करारानुसार राज्यात ७९४.२ एकर जमिनीवर १० हून अधिक आधुनिक औद्याोगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. हे लॉजिस्टिक्स पार्क्स नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विकसित केले जाणार आहेत. यापैकी १.८५ कोटी चौरस फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल.