भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीरवर मुंबईत स्फोट झाला. या अपघातात नौदलाच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मंगळवारी नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे एक दुर्दैवी घटना घडली. आयएनएस रणवीरच्या अंतर्गत डब्यात झालेल्या स्फोटात नौदलाच्या ३ जवानांना प्राण गमवावे लागले. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

आयएनएस रणवीर नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. अपघातानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बोर्ड ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जवानांवर स्थानिक नेव्ही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

आयएनएस रणवीर २८ ऑक्टोबर १९८६ रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. हे ३१० नाविकांच्या टीमद्वारे चालवले जाते. हे शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे. त्यात पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी आणि जमिनीपासून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. याशिवाय यात क्षेपणास्त्रविरोधी तोफा आणि पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचरही आहेत. यापूर्वी २३ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय नौदलाच्या आयएनएस रणविजयमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत चार जण जखमी झाले. आयएनएस रणवीरमध्ये झालेल्या स्फोटानंतर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.