मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ८ दरम्यान गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर १० तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

याशिवाय चर्चगेट – बोरिवली धीम्या लोकल गोरेगाव स्थानकांवरून अंशतः करून पूर्ववत करण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस रेल्वेगाड्या अंदाजे १० ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तर ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द आणि काहीे अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.